Featured Videos

Search videos: siddharthshuklafever

No videos found

Recent Videos

 • कोरोनाविरुद्व लढा त्यासाठी घरीच बसा, अण्णा हजारे यांनी केले अनुभवकथन

  कोरोनाविरुद्व लढा त्यासाठी घरीच बसा, अण्णा हजारे यांनी केले अनुभवकथन

  जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी सर्वानी एकजूट दाखवावी आणि घराच्या बाहेर पडू नये असे आवाहन केलंय . अण्णा हे देखील राळेगण सिद्धी इथेच असून हे गाव देखील लोकडाऊन आहे. अण्णा हजारे यांनी आतापर्यंत आपल्या खोलीच्या बाहेर पाऊल ठेवलं नसल्याचे ते अभिमानें सांगतात

  By Pune Metro| 203 views

 • तृप्ती देसाई यांचा खुलासा, व्हिडीओ खरा पण चुकीच्या पद्दतीने व्हायरल

  तृप्ती देसाई यांचा खुलासा, व्हिडीओ खरा पण चुकीच्या पद्दतीने व्हायरल

  भूमाता ब्रिगेड च्या अध्यक्षा तृप्ती देसाई या दारूच्या दुकानात दारू विकत घेतानाचा आणि त्यांना पोलिसांनी अटक केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता मात्र हा व्हिडिओ चुकीच्या पद्धतीने व्हायरल करून मला व माझ्या कार्याला नाहक बदनाम केलं जात असल्याची तक्रार तृप्ती देसाई यांनी केलीय . मागील वर्षी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात दारूमुक्तीसाठी आंदोलन करण्यासाठी आपण ही दारू विकत घेत होतो त्यावेळी पोलिसांनी मला रोखल्याचा हा व्हिडीओ आहे पण तो चुकीच्या पद्धतीने हा विषय व्हायरल होत असल्याचं त्यांनी सांगितलंय  a

  a

  By Pune Metro| 298 views

 • भारती हॉस्पिटल मधील विलगीकरण कक्ष, पॉझिटिव्ह रुंगांसाठी विशेष कक्ष

  भारती हॉस्पिटल मधील विलगीकरण कक्ष, पॉझिटिव्ह रुंगांसाठी विशेष कक्ष

  भारती हॉस्पिटलमधील कोरोना उपाययोजनांसंदर्भात तयार करण्यात आलेल्या विलगीकरण कक्षाची तसेच पॉझिटीव्ह रुग्णांकरीता तयार करण्यात आलेल्या विशेष कक्षाची विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी प्रत्यक्ष पाहणी करुन रुग्णालयातील तयारीचा आढावा घेतला.
  यावेळी पीएमआरडीएचे आयुक्त विक्रमकुमार,भारती हॉस्पिटलचे वैद्यकिय अधिष्ठाताडॉ. संजय ललवाणी, आयसीयू विभागाचे प्रमुख डॉ.शिवकुमार अय्यर यांच्यासह ररूग्णालयातील प्रमुख डॉक्टर उपस्थित होते.
  विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांनी रुग्णालयातील उपलब्ध साधन सामुग्रीचा आढावा घेतला तसेच वैदयकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या अडचणीसंदर्भात त्यांच्याशी चर्चा केली. तसेच रुग्णालयातील एकूण क्षमता,आयसीयूमध्ये असलेल्या सोई सुविधा आदी तयारीबाबत समाधान व्यक्त केले.
  a

  a


  By Pune Metro| 150 views

 • आमदार संग्राम जगताप यांचा मदतीचा हात, गोरगरिबांना मिळणार किराणा आणि धान्य

  आमदार संग्राम जगताप यांचा मदतीचा हात, गोरगरिबांना मिळणार किराणा आणि धान्य

  नगर शहरातील अनेक निराधार एकटे राहणारे व्यक्ती तसेच झोपडपट्टी परिसरात राहणारी गोरगरीब जनता उपाशी आहे. त्यात प्रशासनाने शहरात फूड पेकेट्सचे वाटप सामाजिक संस्थांना बंद करण्यास सांगण्यात आले आहे. त्यामुळे आगामी काळात शहरात खूपच वाईट परिस्थिती निर्माण होणार आहे . हा धोका ध्यानांत घेऊन आमदार संग्राम जगताप यांनी ज्यांचे पोट हातावर आहे . दररोजची मोलमजुरी मिळाल्याशिवाय ज्यांची चूल पेटत नाही अशा घरामध्ये एक किलो शिधा पोहोचविण्याची व्यवस्था केलीय . यात १ किलो साबुदाणा , एक किलो गहू तळदुल साबण , खोबरेल तेल , चहापत्ती , बेसनपीठ साखर तेल भिस्किटे अशा जीवनावश्यक लागणाऱ्या वस्तूंचा समावेश आहे . येत्या सोमवारपासून या वस्तू वाटपास सुरुवात करण्यात येणार असल्याचं संग्राम जगताप यांनी सांगितलंय . नगर शहरातल्या ६००० कुटुंबियांना या शिधा आणि किराण्याचं वाटप करण्यात येणार आहे . आपले कार्यकर्ते , नगरसेवक आणि राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यामार्फत प्रत्यक्ष गरजू व्यक्ती पर्यंत या वस्तू पोहोचविण्यात येणार आहे .


  a

  By Pune Metro| 197 views

 • कोरोना सुटी कशी घालवाल? जोपासा छंद आणि कलागुण, वाढवा वाचनातून व्यासंग, मुखवटेच्या फेसबुकवरून लाईव्ह

  कोरोना सुटी कशी घालवाल? जोपासा छंद आणि कलागुण, वाढवा वाचनातून व्यासंग, मुखवटेच्या फेसबुकवरून लाईव्ह

  कोरोना सुटी कशी घालवावी असा प्रश्न सर्वानाच पडलाय त्यात दिवसभर काहीच काम न करता घरात राहायचं म्हणजे घर खायला उठत . पण या कोरोना सुट्टीचा सदुपयोग वाचन आपल्याला उपजत कला छंद जोपासण्याचा प्रयत्न अनेकजण करतायेत . नागरमधल्या नाट्य कलावंतांना मुखवटे या संस्थेनं आपले कला सामान्यांपर्यंत पोहोचविण्याची ऑनलाईन संधी उपलब्ध करून दिलीय . या संस्थन आपलं फेसबुक अकाउंट तयार केले असून यात कलाकार कथा कविता सादर करू शकतात कलेविषयी गप्पा मारू शकतात . याचा शुभारंभ संदेश कुलकर्णी लिखित माँटुकले दिवस या पुस्तकाच्या वाचनाने होणार आहे. राहुल दिकोंडा हे याचे अभिवाचन करणार असून येत्या रविवारी ५ एप्रिल रोजी सायंकाळी साडेपाच वाजता मुखवटेच्या फेसबुक पेजवरून लाईव्ह करण्यात येणार आहे . याचा नगरकर रसिकांनी लाभ घेण्याचे आवाहन मुखवटेचे प्रसाद बेडेकर यांनी केलंय  a

  a  <

  By Pune Metro| 148 views

 • पुण्यात आणखी ६ कोरोना पॉझिटिव्ह, वानवडी पोलीस निरीक्षक सलीम चाऊस यांनी दिली माहिती

  पुण्यात आणखी ६ कोरोना पॉझिटिव्ह, वानवडी पोलीस निरीक्षक सलीम चाऊस यांनी दिली माहिती

  पुण्यात वानवडी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत सय्यद नगर मध्ये कोरोना पॉसिटीव्ह रुग्ण आढळून आल्याने त्याच्या संपर्क मध्ये असलेल्या 6 लोकांना रात्री 21:30 वाजता नायडू हॉस्पिटल मध्ये पोहोचविण्यात आले . त्यासाठी नायडू हॉस्पिटलच्या हेल्प लाईनला कॉल करून बोलावण्यात आले होते . त्याच वेळी रामटेकडी झोपडपट्टी मधील लोकांनी स्वतः ची तपासणी करण्याचा आग्रह धरला त्यांना सुद्धा रात्रीच नायडू हॉस्पिटल ला पाठविण्यात आल्याची माहिती वानवडी पोलीस थानायचे पोलीस निरीक्षक सलीम चाऊस यांनी दिलीय.

  By Pune Metro| 6 views

 • नायडू हॉस्पिटलच्या गेटवरच फवारा यंत्रणा, सँनिटाईझर फवारा टनेल कार्यरत

  नायडू हॉस्पिटलच्या गेटवरच फवारा यंत्रणा, सँनिटाईझर फवारा टनेल कार्यरत

  पुणे मनपाच्या आरोग्य विभागाने अवघ्या तीन दिवसात नायडू हॉस्पिटलच्या गेटवर निर्जंतवणुकीकरण फवारा यंञणा बसवलीय.या सँनिटायझर फवारा टनेल पँसेजमुळे या नायडू हॉस्पिटलमध्ये येणारा आणि जाणारा प्रत्येक व्यक्ती हा पूर्णपणे सँनिटाईज होऊनच बाहेर पडणार आहे. त्यामुळे या संसर्ग रूग्णालयात काम करणारे डॉक्टर्स नर्सेस आणि इतर स्टाफला मोठा दिलासा मिळालाय कारण कोरोनाच्या संसर्गाचा त्यांनाच मोठा धोका संभवतोय आता पुण्यातील अनेक ठिकाणी हे सुरू करण्यात येईल याची माहिती आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिलीय

  By Pune Metro| 6 views

 • राशींनच्या मंदिराची गरिबांना मदत, ३०० व्यक्तींना दिले जीवनावश्यक वस्तूंचे कीट

  राशींनच्या मंदिराची गरिबांना मदत, ३०० व्यक्तींना दिले जीवनावश्यक वस्तूंचे कीट

  राशीन येथील श्री जगदंबा देवी पब्लिक ट्रस्ट च्या वतीने राशीनमधील गरजू कुटुंबाना तसेच पर राज्यातील नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
  कर्जत चे तहसिलदार वाघ यांच्या उपस्थितीत या गरजूंना ट्रस्टच्या वतीने जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप केले. सधरणतः 300 व्यक्तीला हे किटचे वाटप करणार असल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष निळकंठ देशमुख यांनी दिली. तसेच समाज्यातील दानशूर व्यक्तींनी अशा प्रकारे गरजूंना अन्नदान करण्याचे आव्हाहन केले.


  a

  a
  By Pune Metro| 5 views

 • नगरमध्ये दिव्यांग सहायता कक्षाची स्थापना, जानकीबाई आपटे मूकबधिर विद्यालयात कक्ष कार्यान्वित

  नगरमध्ये दिव्यांग सहायता कक्षाची स्थापना, जानकीबाई आपटे मूकबधिर विद्यालयात कक्ष कार्यान्वित

  केंद्र शासनाच्‍या सामाजिक न्‍याय व अधिकारिता मंत्रालय, दिव्‍यांगजन सशक्‍तीकरण विभाग, नवी दिल्‍ली यांनी कोरोना विषाणू प्रादुर्भाव कालावधीत दिव्‍यांग व्‍यक्‍तींच्‍या संरक्षण आणि सुरक्षेसाठी व मार्गदर्शक सूचनांचे जिल्‍हास्‍तरावर अंमलबजावणी करण्‍यासाठी जिल्‍हास्‍तरीय कोरोना सहाय्य दिव्‍यांग कक्ष जानकीबाई आपटे मुकबधीर विद्यालय, टिळक रोड, अहमदनगर येथे स्‍थापन करण्‍यात आला असून त्यासाठी अधिकारी कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती नोडल अधिकारी, जिल्‍हास्‍तरीय करोना सहाय्य दिव्‍यांग कक्ष तथा जिल्‍हा समाज कल्‍याण अधिकारी नितीन उबाळे यांनी दिली


  a

  a


  By Pune Metro| 7 views

 • ट्रिपल आय डीची चित्रकला स्पर्धा, ६१ स्पर्धकांचा सहभाग, व्हाट्स अप वर मागविल्या कलाकृती

  ट्रिपल आय डीची चित्रकला स्पर्धा, ६१ स्पर्धकांचा सहभाग, व्हाट्स अप वर मागविल्या कलाकृती

  येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इंटेरिअर डिझायनर्स अर्थात ट्रिपल आय डी या संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाईन चित्रकला स्पर्धेला अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला . सध्या कोरोनामुळे सर्वजण घरी बसून आहेत . घरात असलेल्या लहान मुलांना देखील काय करावे हे कळेनासे झाले आहे. त्यामुळे त्यांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या उपक्रमांचे ऑनलाईन आयोजन करण्याचे संस्थेने ठरवले . याच उपक्रमांतर्गत ट्रिपल आय डी चे सर्व सदस्य आणि डिझयनर्स यांच्या मुलासाठी ही ओंन लाईन चित्रकला स्पर्धा आयोजित केली . या स्पर्धेत सर्व मुलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला . तब्बल ६१ स्पर्धकांनी ऑनलाईन सहभाग नोंदविला असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष अवतारसिंग हिरा यांनी दिली .
  इयत्ता १ ली ते ३ री , इयत्ता ४ थी ते ७ वी , इयत्ता ८ वी ते १० वी , सदस्य आणि डिझायनर्स अशा चार गटात ही स्पर्धा घेण्यात आली . पहिल्या गटासाठी माझे आवडते कार्टून , दुसऱ्या गटासाठी निसर्ग आणि मोठ्या गटासाठी कोरोना व्हायरस विरुद्ध लढ़ाई आणि मेम्बर्स डिझायनर्स गटासाठी वर्क फ्रॉम होम असे विषय देण्यात आले होते . अशी माहिती ट्रिपल आय डी चे सचिव अजय अपूर्वा यांनी दिली . या स्पर्धेचे परीक्षण प्रसिद्ध चित्रकार व खडू शिल्पकार अशोक डोळसे व प्रसिद्ध शिल्पकार कांतु गवळी यांनी केले . ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी डिझायनर आशिष गुरुनानी , सुरज नन्नवरे , सूरज झिने , कविता पहूजा , ओम नगरकर , सतीश बजाज , कुणाल डुंगरवाल यांनी परिश्रम घेतले .

  By Pune Metro| 5 views

 • लाड यांच्या व्यक्तव्याचा घेतला समाचार - जितेंद्र आव्हाड

  लाड यांच्या व्यक्तव्याचा घेतला समाचार - जितेंद्र आव्हाड

  राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी याच्या दिवे लावण्याच्या इव्हेंटबद्दल टीका केली . त्यांच्या या वक्तव्यांचे काही ठिकाणी स्वागत आणि विरोध देखील झाला . पण काहींनी त्यांना जातीयवादी ठरवलं याबद्दल त्यांनी स्पष्टीकरण दिलंय .


  a

  a
  By Pune Metro| 6 views

 • दिवे लावा पण घरचे दिवे विझवू नका ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचे आवाहन

  दिवे लावा पण घरचे दिवे विझवू नका ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचे आवाहन

  देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी घरातले लाईट बंद करून मेणबत्या पेटवा असं आवाहन केलंय . पण यामुळं विजेची मागणी अचानक कमी होऊन ग्रीड फेल होण्याचा आणि आपल्या घरातील सुरु असलेली वैद्यकीय उपकरणे जळू शकतात त्यामुळे मेणबत्त्या पेटवा पण लाईट बंद करू नका असं आवाहन राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी केलंय .  a

  a


  By Pune Metro| 5 views

 • शिरूरच्या मशिदीतून १० निझामुद्दीन रिटर्न फरार, पण ते हे नव्हेच : डॉ. दीपक म्हैसेकर

  शिरूरच्या मशिदीतून १० निझामुद्दीन रिटर्न फरार, पण ते हे नव्हेच : डॉ. दीपक म्हैसेकर

  पुण्यातून ज्यांनी निजामुद्दीन येथील मरकज मध्ये सहभाग घेतला ती तबलीगीची 10 लोक ज्यांना होमक्वारंटाइनमध्ये ठेवण्यात आले होते ती पळून गेली आहेत. असे वृत्त काही वृत्तवाहिन्यांवर दाखवण्यात येत आहे, मात्र याबाबत विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसकर यांनी खुलासा केला आहे की, ही लोक 23 फेब्रुवारीला दिल्लीहून पुण्यामध्ये आली होती आणि पुण्यातच 6 मार्चपर्यंत होती. 6 मार्चला ही लोक शिरुरमधे शिफ्ट झाली, शिरुरच्या एका मजिदमध्ये ते थांबलेले होते. 1 एप्रिलला जेव्हा दिल्लीची निजामुद्दीनची घटना उघडकीस आली त्यानंतर त्यांना होमक्वारंटाइनचे शिक्के मारण्यात आले होते. मात्र ती लोक फरार झालेली आहेत. वैद्यकीय औषध घेवून जाणा-या ट्रकमधून ते फरार झाले असा पोलीसांचा अंदाज आहे. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांचे मोबाईल नंबर आमच्याकडे आहेत. सीडीआरवरून त्यांचे ट्रेसिंग केल्या जात आहे. परंतू निजामुद्दीन येथील कार्यक्रमात सहभागाची जी यादी देण्यात आली आहे. त्यामध्ये या व्यक्तींची नाव नव्हती आणि ही त्यापैकी आहेत असे आमच्या रेकॉर्डवरून तरी स्पष्ट होत नाही. ती तबलीगीशी संबंधीत आहेत ही वस्तुस्थिती आहे, आणि म्हणूनच त्यांचा शोध सुरू आहे. मात्र ते पुण्यामध्ये 23 फेब्रुवारीलाच आले होते असेही विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांनी स्पष्ट केले.


  a


  <

  By Pune Metro| 5 views

 • नागरकरांसाठी आनंदाची बातमी, कोरोना संसर्गित दुसरा रुग्ण झाला बरा

  नागरकरांसाठी आनंदाची बातमी, कोरोना संसर्गित दुसरा रुग्ण झाला बरा

  कोरोना विषाणूची बाधा झालेला दुसरा रुग्ण बूथ हॉस्पिटल येथून बरा होऊन आज त्याच्या घरी रवाना झाला. यावेळी हॉस्पिटलमधील वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी टाळ्या वाजवून त्याला रवाना केले. कोरोना विषाणूची बाधा झालेला दुसरा रुग्ण बरा झाल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या या यशाचे कौतुक केले आहे.
  कोरोनामुक्त झालेल्या हा रुग्ण रवाना होताना महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी, बूथ हॉस्पिटलचे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते. नगर शहरात सध्या कोरोनाबाधित १७ रुग्ण असून त्यापैकी २ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आत्तापर्यंत जिल्ह्यात ४९४ रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. जिल्ह्यात सुमारे १ लाख १० हजार जणांना १४ दिवस घरामध्ये बसण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत. कोरोना विषाणूच्या साथसाखळी तोडण्यात परमेश्वर आम्हाला नक्कीच बळ देईल, अशी प्रतिक्रिया यावेळी जिल्हा रुग्णालयाचे डॉ. वैजनाथ गुरवले व बूथ हॉस्पिटलचे वैद्यकीय अधिकारी देवदन कळकुंबे यांनी यावेळी व्यक्त केली.


  a  By Pune Metro| 5 views

 • होम क्वारंटाईन फिरतायेत बिनबोभाट, राहुरीत घबराटीचे वाटेवर

  होम क्वारंटाईन फिरतायेत बिनबोभाट, राहुरीत घबराटीचे वाटेवर

  नगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात बाहेर गावातुन आलेल्या तसेच होम क्वाॅरन्टांईन असलेल्या व्यक्तींची चौकशी करणारया आरोग्य कर्मचारयांना होम क्वारंटाईन असलेल्या नागरीकांकडुन सहका र्य मिळत नसल्यान आरोग्य कर्मचार्यांची चांगलीच दमछाक होत आहे .
  पर राज्यातून राहुरी तालूक्यात येणार्यांची संख्या सुमारे पाच हजारच्या आसपास आहे. या सर्व लोकांची तपासणी करून आरोग्य विभागा मार्फत त्यांच्या हातावर होम क्वारंटाईनचे शिक्के मारण्यात आले आहेत. आणि १४ दिवस त्यांनी घरातून बाहेर पडू नये. असे सक्तिने सांगण्यात आलेय . मात्र राहुरी शहरातील काही भागात होम क्वारंटाईनचे शिक्के असलेले नागरीक मोकाटपणे फिरत असताना दिसत आहेत . त्यामुळे शहरातील इतर नागरीक भयभीत झाले आहेत. होम क्वारंटाईनचे शिक्के असलेल्या लोकांनी घरातच रहावे बाहेर कुठेही फिरु नये अशी सक्त ताकीद आरोग्य विभागाकडून त्यांना देण्यात आली आहे,


  a

  a

  By Pune Metro| 5 views

 • घंटागाड्या पुन्हा रस्त्यावर

  घंटागाड्या पुन्हा रस्त्यावर

  नगर मनपा कर्मचाऱ्यांना मारहाण झाल्यामुळं मनपा कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप अखेर माग घेण्यात आला . मारहाण करणाऱ्या हल्लेखोरांना एम आय डी सी पोलिसांनी रात्रीतून अटक केल्यामुळे हा संप माग घेण्यात आल्याचं कामगार युनियनच्या वतीने सांगण्यात आलं . मनपा आयुक्त मायकवालवार यांनी नगर शहरात फवारणी सकाळी ६ ते सायंकाळी ६ या वेळेतच होणार असल्याचं सांगितलंय .
  दोषी नगरसेविकेचं नगरसेवकपद रद्द करण्याची कार्यवाही तात्काळ केली जाईल यासाठी प्रस्ताव तयार करण्यात येणार असल्याचं कामगार नेते अनंत लोखंडे यांनी सांगितलंय .
  कर्मचाऱ्यांनी संप माग घेतल्यानंतर पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी साफसफाईच्या कामास लगेचच सुरुवात केली . घंटागाड्या मार्फत कचरा उचलण्यास सुरुवात करण्यात आली . इतरही कामे सुरु झाल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलंय .  a

  a  <

  By Pune Metro| 5 views

 • पुण्यात आणखी ६ कोरोना पॉझिटिव्ह, नायडू हॉस्पिटल मध्ये केले दाखल

  पुण्यात आणखी ६ कोरोना पॉझिटिव्ह, नायडू हॉस्पिटल मध्ये केले दाखल

  पुण्यात वानवडी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत सय्यद नगर मध्ये कोरोना पॉसिटीव्ह रुग्ण आढळून आल्याने त्याच्या संपर्क मध्ये असलेल्या 6 लोकांना रात्री 21:30 वाजता नायडू हॉस्पिटल मध्ये पोहोचविण्यात आले . त्यासाठी नायडू हॉस्पिटलच्या हेल्प लाईनला कॉल करून बोलावण्यात आले होते . त्याच वेळी रामटेकडी झोपडपट्टी मधील लोकांनी स्वतः ची तपासणी करण्याचा आग्रह धरला त्यांना सुद्धा रात्रीच नायडू हॉस्पिटल ला पाठविण्यात आल्याची माहिती वानवडी पोलीस थानायचे पोलीस निरीक्षक सलीम चाऊस यांनी दिलीय  a

  a


  By Pune Metro| 5 views

 • जैन कॉन्फरन्स व धर्मदाय एकता मंचाचा उपक्रम सी आर पी एफ च्या जवानांना मोफत निवास व भजन

  जैन कॉन्फरन्स व धर्मदाय एकता मंचाचा उपक्रम सी आर पी एफ च्या जवानांना मोफत निवास व भजन

  जामखेड मधील जैन कॉन्फरन्स चे कार्यकर्ते आणि धर्मोदाय ऐकता मंच तर्फे गावात बंदोबस्तासाठी आलेल्या एस आर पी एफच्या जवानांना जेवणाची व्यवस्थाकरण्यात आली आहे
  इथले सामाजिक कार्यकर्ते तथा जैन कॉन्फरन्स चे राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य संजय कोठारी, भारतीय जैन संघटनेचे तालुका समन्वयक प्रफुल्ल सोळंकी, चेतन सुरणा, संदेश कोठारी, आशुतोष छाजेड, राहुल राखेचा, रोहित राखेचा, प्रशांत राखेचा ,रसिकलाल बोथरा ,योगेश भंडारी ,तुषार बोरा कैलास शर्मा, युवराज चटेकर यांच्या पुढाकारातून ही सेवा सुरु करण्यात आलीय . अहमदनगर जिल्हयात कोरोणाने धूमाकूळ घातला असून जामखेड मधेही कोरोणाचे ५ रूग्न आढळून आल्यामुळे नुकतेच जामखेड शहरांमध्ये कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे त्या साठी जामखेड शहरात १०५ एस.आर.पी.चे जवान दाखल झालेले आहेत. या सर्व जवानांना राहण्याची व्यवस्था जैन श्रावक संघाचे महाविर भवन इथं मोफत करण्यात आली आहे. या सर्वांची भोजनाची ची व्यवस्था येथे केलेली आहे. लॉक डाऊनच्या काळात कोणीही घरा बाहेर पडु नये, एस आर पी एफ चे जवान आपल्याला ओळखत नाहीत त्यामुळे बाहेर दिसणाऱ्या ला उगीचच फटके बसतील. त्यामुळे शांतता राखून पोलीस व एस.आर.पी.जवानांना सहकार्य करण्याचे अवाहन संजय कोठारी यांनी केले आहे.
  प्रतिनिधी नासीर पठाण सह अशोक वीर जामखेड  a
  By Pune Metro| 5 views

 • गरिबांना मदत द्या, रेशन दुकाने सुरु करा, उपासमार थांबवा, सामाजिक कार्यकर्ते संतोष कानडे

  गरिबांना मदत द्या, रेशन दुकाने सुरु करा, उपासमार थांबवा, सामाजिक कार्यकर्ते संतोष कानडे

  नगर शहर लॉक डाऊन आहे . त्यामुळे गोरगरिबांचे हाल होतायेत . त्यांना मदतीसाठी अनेक हात पुढे आले पण जनसंपर्क टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने अशी मदत करणाऱ्या संस्थांच्या स्वयंसेवकांनाच फटके मारण्यास सुरुवात केलीय . आणि जिल्हा प्रशासनाची यंत्रणा मदत करण्यासाठी अपुरी पडते आहे . धान्य पुरवठा होत नसल्याने स्वस्त धान्य दुकाने देखील बंद आहेत. त्यामुळे सरकारने या गोर गरीब जनतेच्या मदतीसाठी तात्काळ पुढे यावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संतोष कानडे यांनी केली केलीय .

  By Pune Metro| 5 views

 • नाट्य परिषदेची अभिनव स्पर्धा, स्वगत , एकपात्री किंवा नाट्यछटा स्पर्धा व्हाट्स अप नंबर : ९८२३२९७५२९

  नाट्य परिषदेची अभिनव स्पर्धा, स्वगत , एकपात्री किंवा नाट्यछटा स्पर्धा व्हाट्स अप नंबर : ९८२३२९७५२९

  सध्या नगर शहरात संचारबंदी असल्याने नाट्यकलाकारांना देखील घरीच बसावे लागतेय . नगर मधील नाट्य कलाकारांना दिवस कसा घालवावा असा प्रश्न पडलेला आहे . त्यामुळे नगरच्या अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या वतीने संकल्पना आमची आविष्कार तुमचा घरबसल्या जोपासू वारसा कलेचा या अंतर्गत ऑनलाईन नाट्यकला स्पर्धेचं आयोजन केलंय . एकपात्री नाट्यछटा आणि स्वगत अशा तीन प्रकारात ही स्पर्धा होणार असून हा व्हिडीओ घरीच तयार करून तो व्हाट्स अप नंबरवर टाकायचाय . जास्तीत जास्त स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घेऊन ८ एप्रिल पर्यंत आपला व्हिडीओ पाठवण्याचं आवाहन अध्यक्ष अमोल खोले यांनी केलंय .  a

  a


  By Pune Metro| 5 views

 • शिऊरमधील शेतकरी संदीपान निंबाळकर यांनी पेरुची बाग प्रशासनाकडे सोपवली

  शिऊरमधील शेतकरी संदीपान निंबाळकर यांनी पेरुची बाग प्रशासनाकडे सोपवली

  दहा टन पेरु जनतेला वितरित करण्याची विनंती

  Watch शिऊरमधील शेतकरी संदीपान निंबाळकर यांनी पेरुची बाग प्रशासनाकडे सोपवली With HD Quality

  By Mahanagar News Ahmednagar| 5 views

 • गोरगरीबांसह ख्रिस्ती धर्मगुरुंना किराणा मालाचे वितरण

  गोरगरीबांसह ख्रिस्ती धर्मगुरुंना किराणा मालाचे वितरण

  अहमदनगर डिस्ट्रिक्ट रेव्हरंड ऍण्ड पास्टर्स असोसिएशनचा उपक्रम

  Watch गोरगरीबांसह ख्रिस्ती धर्मगुरुंना किराणा मालाचे वितरण With HD Quality

  By Mahanagar News Ahmednagar| 5 views

 • चांगली बातमी...नगरमध्ये आणखी एक कोरोनाग्रस्त रूग्ण ठणठणीत

  चांगली बातमी...नगरमध्ये आणखी एक कोरोनाग्रस्त रूग्ण ठणठणीत

  बूथ हॉस्पिटलमधून टाळ्यांच्या कडकडाटात रूग्णाला घरी सोडले

  Watch चांगली बातमी...नगरमध्ये आणखी एक कोरोनाग्रस्त रूग्ण ठणठणीत With HD Quality

  By Mahanagar News Ahmednagar| 4 views

 • नेप्ती उपबाजार समितीतील हमाल मापाडी कष्टकर्‍यांना किराणा मालाचे वितरण

  नेप्ती उपबाजार समितीतील हमाल मापाडी कष्टकर्‍यांना किराणा मालाचे वितरण

  माजी आ.शिवाजी कर्डिलेंसह बाजार समिती पदाधिकारी, संचालकांची उपस्थिती

  Watch नेप्ती उपबाजार समितीतील हमाल मापाडी कष्टकर्‍यांना किराणा मालाचे वितरण With HD Quality

  By Mahanagar News Ahmednagar| 5 views

 • 9 वर्षाच्या कशिश असनाणी हिची संवेदनशीलता लंगरसेवेच्या कार्यासाठी दिला स्वत:च्या खाऊच्या पैशाचा खजिना

  9 वर्षाच्या कशिश असनाणी हिची संवेदनशीलता लंगरसेवेच्या कार्यासाठी दिला स्वत:च्या खाऊच्या पैशाचा खजिना  Watch 9 वर्षाच्या कशिश असनाणी हिची संवेदनशीलता लंगरसेवेच्या कार्यासाठी दिला स्वत:च्या खाऊच्या पैशाचा खजिना With HD Quality

  By Mahanagar News Ahmednagar| 5 views