Search videos: #rahul

 • वाबळे परिवाराचे नव्या व्यवसायात पाऊल सावेडीत डेली नीड्स शॉपिंग मॉल सुरु आ .

  वाबळे परिवाराचे नव्या व्यवसायात पाऊल सावेडीत डेली नीड्स शॉपिंग मॉल सुरु आ .

  सावेडी भागातील पाईपलाईन रोडवरील कोहिनूर मंगल कर्यलासमोर आज डेली नीड्स या नावाने नवीन दुकान सुरु करण्यात आले आहे. पारंपरिक पद्धतीने फीत कंपाऊंया दुकानाचे उदघाटन आमदार संग्रामभैय्या जगताप यांच्या हस्ते करण्यात आलय. डेली नीड्स या माध्यमातून  नागरिकांच्या दैनंदिन गरज भागवण्याचा दृष्टीने ह्या दुकान सुरु करण्यात आलय.  a

  a


  By Pune Metro| 226 views

 • जय हिंद वृक्ष बँकेच्या माध्यमातून ५०० वडाची झाडे वृक्षारोपण

  जय हिंद वृक्ष बँकेच्या माध्यमातून ५०० वडाची झाडे वृक्षारोपण

  नगरच्या इतिहासात प्रथमच ५०० वडाची झाडे लावून परिसर प्रदूषणमुक्त होणार


  अहमदनगर मधील आजी माजी सैनिक एकत्र येऊन २०१७ ला जय हिंद सैनिक सेवा फौंडेशनची नगर मध्ये स्थापना करण्यात आलीय, याच फौंडेशनच्या माध्यमातून २८ आणि २९ जून २०२० ला जय हिंद वृक्ष बँकेच्या माध्यमातून पाथर्डी तालुक्यातील कोल्हुबाईच्या कोल्हार गडावर महादेव मंदिर परिसरात ५०० वडाची झाडे लावण्याचा संकल्प करण्यात आला आहे,सकाळी साडेदहा ते साडेचार वाजेपर्यँत महादेवाच्या पिंडीच्या आकारात हि झाड लावली जाणार आहेत, नगरच्या इतिहासात प्रथमच ५०० वडाची झाडे लावून परिसर प्रदूषणमुक्त होणार आहे. अहमदनगर जिल्ह्यासाठी तर हा सोनेरी प्रकल्प ठरणार आहे, त्यामुळे सर्वानी या अभियानात सहभागी होत,आपल्याला वेळ मिळेल तस उपस्थित राहून किमान २ झाडे लावावीत अशी विनंती जय हिंद सैनिक सेवा फौंडेशन तर्फ़े करण्यात आलीय.  a

  a
  <

  By Pune Metro| 176 views

 • जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकार्यानी २ शिक्षकांची वेतनवाढी रोखण्याचा दिला आदेश

  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकार्यानी २ शिक्षकांची वेतनवाढी रोखण्याचा दिला आदेश

  नगर तालुक्यातील देवगावमधल्या जिल्हा परिषदेच्याशाळेतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता समाधानकारक न वाटल्याने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकार्यानी तिथल्या २ शिक्षकांची दोन वेतनवाढी रोखण्याचा आदेश दिलाय. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज पाटील यांनी लॉक डाउनच्या आधी शाळेला अचानक भेट देऊन तिथल्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता तपासली होती. त्यावेळी चक्क पाचवीत गेलेल्या मुलाला सुद्धा लिहिता वाचता येत नसल्याचं त्याचं या तपासात निदर्शनाला आलं ,बऱ्याच मुलांना तर अहमदनगर हे नाव सुद्धा लिहिता आलं नाही,इतर विषयात हि विद्यार्थ्यांची प्रगती तोकडी वाटली त्यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी तिथल्या शिक्षकांना धारेवर धरलं होत,विद्यार्थ्यांना जर प्राथमिक गोष्टीच येत नसतील तर शिक्षक शाळेत काय करतात असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. अश्या कामचुकार शिक्षकांची तात्काळ बदली करन्याची मागणी ग्रामस्थांनी केल्याने देवगाव ग्रामपंचायतीच्या वतीने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षणाधिकारी यांना निवेदन देण्यात येणार आहे.


  a

  By Pune Metro| 281 views

 • नगरमध्ये शाहू महाराजांना लोकभज्ञाक शासकरत्न म्हणून मानवंदना

  नगरमध्ये शाहू महाराजांना लोकभज्ञाक शासकरत्न म्हणून मानवंदना

  अहमदनगर(प्रतिनिधी)- राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती दिनी हुतात्मा स्मारकात शुक्रवारी पीपल्स हेल्पलाईन, भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन व भारतीय जनसंसदच्या वतीने वेबीनार घेऊन शाहू महाराजांना लोकभज्ञाक शासकरत्न ही राष्ट्रीय मानवंदना देण्यात आली. तर कोरोनाच्या संकटकाळात सर्वसामान्यांचे प्रश्‍न सोडविण्यास शासनकर्ते, लोकप्रतिनिधी, न्याय व्यवस्था, सरकारी अधिकारी यांनी पाठ फिरवली असताना अशांच्या प्रतिकात्मक बुजगावण्याच्या गळ्यात बांगड्या अडकवून निषेध नोंदविण्यात आला.  a

  a

  By Pune Metro| 226 views

 • फोबिया कोरोनामूळे अर्थव्यवस्था डबघाईला,ऍडव्होकेट कारभारी यांनी नोंदवला सरकारी नोकरदार वर्गाचा निषेध

  फोबिया कोरोनामूळे अर्थव्यवस्था डबघाईला,ऍडव्होकेट कारभारी यांनी नोंदवला सरकारी नोकरदार वर्गाचा निषेध

  देशभरात फोबिया कोरोनामूळे अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे, त्यामुळे अनेक जणांवर उपासमारीची वेळ आली आहे, जर आपण नियमित hanswash, sanitaizr आणि मास्क चा वावर केला तर निश्चितच कोरोनाचा संसर्ग टाळता येऊ शकतो, चीनमध्ये शाळा महाविद्यालय सुरू करायला परवानगी मिळाली आहे,मात्र भारतात अजूनही विद्यार्थ्यांना वाट बघावी लागते,भारतात 4लाख लोकांचे रोजचे कामाचे तास वाया जातात त्यामध्ये नोकरदार ,सरकारी मंत्री ,लोकप्रतिनिधी तसेच न्यायव्यवसंस्थेचा ही समावेश आहे,हे सगके आपले कर्तव्य सोडून बिळात लपून बसल्याची टीका कारभारी गवळी यांनी केली आहे. याचा निषेध त्यांनी केला आहे.  a

  a


  By Pune Metro| 55 views

 • कोहिनूर क्लाथ स्टोर मध्ये तीन कोरोनाबाधित रुग्ण, सर्वच कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी

  कोहिनूर क्लाथ स्टोर मध्ये तीन कोरोनाबाधित रुग्ण, सर्वच कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी

  कोहिनूर क्लाथ स्टोर मध्ये तीन कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यामुळे तेथील सर्वच कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात येत आहे. आरोग्य खात्याचे पथक शनिवारी सकाळी दुकानात दाखल झाले. त्यांनी कर्मचाऱ्यांच्या घशातील स्त्राव घेण्यास सुरुवात केली आहे. सायंकाळी अहवाल आल्यानंतर हे दुकान तसेच कापडबाजार सुरु ठेवायचे कि नाही याचा निर्णय घेतला जाईल.  a

  a  By Pune Metro| 13 views

 • हॉस्पिटलचा गैरप्रकार चव्हाट्यावर, महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेपासून ढवळे कुटुंब वंचित

  हॉस्पिटलचा गैरप्रकार चव्हाट्यावर, महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेपासून ढवळे कुटुंब वंचित

  नगरच्या सावेडी परिसरातील हॉस्पिटलने संपूर्ण बिल देऊन सुद्धा पेशंटला घरी न सोडल्याबाबत तसेच महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत जाणीव पूर्वक पेशन्टला लाभ मिळण्यापासून वंचित ठेवल्याने वांबोरी येथील हेमंत ढवळे यांनी नगरच्या जिल्हाधिकाऱयांना  आज निवेदन दिल आहे.हेमंत यांचे वडील  चंद्रकांत ढवळे यांच्या छातीत दुखत असल्याने त्यांना वांबोरीचे स्थानिक डॉक्टर झंवर  यांच्या सल्ल्याने नगरच्या  हॉस्पिटलमध्ये ११ जूनला आणण्यात आलं होत,यावेळी आपल्याला पांढरे कुपन असून महात्मा फुले जन  आरोग्य  योजनेचा लाभ आपल्याला मिळावा अशी विंनती त्यांनी केली मात्र तिथल्या डॉक्टरांनी पांढऱ्या कूपनवर तुम्हाला कोणताही लाभ मिळू शकत नसल्याचं सांगितलं, आरोग्य मित्रांकडे चौकशी केली असताना त्यांनी तुम्हाला लाभ मिळेल असं सांगितलं त्यांच्या विरोधात तक्रार केली तर डॉक्टर यांनी त्त्यांना  खडे बोल सुनावले . ३ दिवस बिल न भरल्याने डॉक्टरांनी त्यांना डिस्चार्ज सुद्धा दिला नाही. आणि बिल भरल्या नंतर सुद्धा धमकी  दिलीय. या सर प्रकरामुळे ढवळे कुटुंब भीतीच्या सावटाखाली आलं आहे. त्यामुळे आज ढवळे यांनी हॉटेल श्रद्धा मध्ये पत्रकार परिषद घेऊन  हॉस्पिटल वर कडक कारवाई करण्याची मागणी केलीय,तसेच डॉक्टर  यांच्याविरोधात पैसे उकळण्या प्रकरणी  कारवाई करण्याची मागणी केली आहे. ३० जून पर्यंत सर्व नागरिकांना मोफत उपचार असून शासनाच्या आदेशाची पायमल्ली केल्याचं या प्रकरणात दिसून आली आहे. यावेळी या परिषदेला प्रकाश शेटे , विश्वास वैरागर , हेमंत ढवळे  यांसह अनेकजण उपस्थित होते.

  Watch हॉस्पिटलचा गैरप्रकार चव्हाट्यावर, महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेपासून ढवळे कुटुंब वंचित With HD Quality

  By Pune Metro| 8 views

 • सिद्धार्थ नगर भागात ०६, वाघगल्ली नालेगाव भागात ०४, तोफखाना भागात १२ आणि सिव्हिल हडको भागात 2 रुग्ण

  सिद्धार्थ नगर भागात ०६, वाघगल्ली नालेगाव भागात ०४, तोफखाना भागात १२ आणि सिव्हिल हडको भागात 2 रुग्ण

  जिल्ह्यात आज सायंकाळी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये २८ व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आढळून आला आहे. यामध्ये नगर शहरातील २४, कर्जत तालुक्यातील ०२, जामखेड तालुक्यातील एक आणि शिर्डी येथील एका रुग्णाचा समावेश आहे. यामुळे जिल्ह्यातील ॲक्टिव रुग्णांची संख्या आता १०५ इतकी झाली आहे.

  नगर शहरात सिद्धार्थ नगर भागात ०६, वाघगल्ली नालेगाव भागात ०४, तोफखाना भागात १२ आणि सिव्हिल हडको भागात दोन रुग्ण आढळून आले आहेत. याशिवाय शिर्डी येथे एक आणि कर्जत तालुक्यातील आळसुंदे येथे दोन रुग्ण आढळून आले आहेत. तसेच जामखेड तालुक्यातील जवळके येथे एक रुग्ण बाधित आढळून आला आहे, अशी माहिती नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाढे यांनी दिली.
  सिव्हिल हडको भागात आढळून आलेले रुग्ण हे मूळचे जगतापवाडी येथील आहेत.

  *दरम्यान, जिल्ह्यातील ०५ कोरोनाग्रस्त रुग्ण आज सकाळी बरे होऊन घरी परतले. या रुग्णांना आज डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे जिल्ह्यात कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या आता २६५ इतकी झाली आहे. कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णामध्ये संगमनेर येथील ०३, पाथर्डी आणि पारनेर तालुक्यातील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश असल्याची माहिती डॉ. गाढे यांनी दिली.

  Watch सिद्धार्थ नगर भागात ०६, वाघगल्ली नालेगाव भागात ०४, तोफखाना भागात १२ आणि सिव्हिल हडको भागात 2 रुग्ण With HD Quality

  By Pune Metro| 10 views

 • बालगंधर्व रंगमंदिराचा 53 वा वर्धापनदिन सोहळा साधेपणाने साजरा

  बालगंधर्व रंगमंदिराचा 53 वा वर्धापनदिन सोहळा साधेपणाने साजरा

  बालगंधर्व रंगमंदिर सोहळा नेहमी सालाबादप्रमाणे 26 जून रोजी दिमाखात उत्साहात साजरा करण्यात येणारा बालगंधर्व रंगमंदिराचा 53 वा वर्धापनदिन सोहळा यंदाच्या वर्षी साधेपणाने साजरा झाला.कोरोना सारख्या महाभयंकर विषाणूमुळे सर्व परिस्थिती लक्षात घेऊन व शासनाच्या आदेशानुसार व सर्व नियमांचे पालन करून पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ ,उपमहापौर सरस्वती ताई शेंडगे, अध्यक्ष मेघराज राजेभोसले ,लक्ष्मीकांत खाबिया व परिवारातील मोजकेच पदाधिकारी व सदस्य एकत्र येऊन 53 वा वर्धापनदिन प्रतिमेस पुष्प अर्पण करून व केक कापून प्रातिनिधिक स्वरूपात संपन्न झाला .


  a

  a
  <

  By Pune Metro| 26 views

 • पुण्यात 1 कोटीचा गांजा व 75 लाखांचे चरस जप्त, सीमा शुल्क विभागाच्या अमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई

  पुण्यात 1 कोटीचा गांजा व 75 लाखांचे चरस जप्त, सीमा शुल्क विभागाच्या अमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई

  पुणे सीमा शुल्क विभागाच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने तब्बल एक कोटीचा गांजा आणि 75 लाखांचे चरस जप्त केले आहे. याप्रकरणी चार जणांना अटक केली असून त्यांच्याकडून दोन वाहनेही जप्त करण्यात आले आहे.
  अटक करण्यात आलेल्या चौघांकडे एक कोटी किंमतीचे 868 किलो गांजा आणि 75 लाख रुपयांचे 7.5 किलो चरस आढळून आले
  आंध्र प्रदेशातील काही दुर्गम ठिकाणांमधून महाराष्ट्रातील निरनिराळ्या ठिकाणांसाठी अंमली पदार्थ वाहतूक करणाऱ्या ट्रकविषयी मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार पुणे सीमाशुल्क विभागाच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या अधिकाऱ्यांनी नळदुर्ग-सोलापूर रोडवर सोलापूरच्या बोरामणी गावाजवळ काल (बुधवारी) दुपारी साडेचार वाजल्यापासून पाळत ठेवली होती.


  a

  a

  <

  By Pune Metro| 25 views

 • भारत-चीन सीमेवर शहीद झालेल्या 20 जवानांना श्रद्धांजली ,पुणे शहर काँग्रेसचे अनेक नेते उपस्थित

  भारत-चीन सीमेवर शहीद झालेल्या 20 जवानांना श्रद्धांजली ,पुणे शहर काँग्रेसचे अनेक नेते उपस्थित

  पुणे शहर काँग्रेस कमिटी तर्फे आज पुण्यातील कॅम्प परिसरा मध्ये भारत-चीन सीमेवर शहीद झालेल्या 20 जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शहीदो को सलाम दिवस हा मेणबत्ती पेटवून आणि पुष्प अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली... यावेळी पुणे शहर काँग्रेस गटनेते आबा बागुल, मोहन जोशी अभय छाजेड आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते ..भारत-चीन सीमेवर शहीद झालेले जवान प्रति देशांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदर ठेवावा.. चीनी सैनिकांनी घुसखोरी केली नाही पंतप्रधान कार्यालय यांनी याबाबत खुलासा करावा समोर येऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेची माफी मागावी अशी मागणी काँग्रेस ज्येष्ठ नेते मोहन जोशी यांनी व्यक्त केली.

  By Pune Metro| 11 views

 • चित्रपट सृष्टीतील विविध कामांना शासनाची परवानगीमनोरंजन व चित्रपट क्षेत्राला दिलासा

  चित्रपट सृष्टीतील विविध कामांना शासनाची परवानगीमनोरंजन व चित्रपट क्षेत्राला दिलासा

  मुंबई : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन सुरू असल्यामुळे ठप्प झालेली चित्रपटसृष्टीतील कामे पुन्हा सुरू झाली आहेत. राज्य शासनाने काही अटी-शर्तींच्या अधीन राहून चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी मालिकांच्या चित्रीकरणास मान्यता दिली आहे, शासनाच्या या निर्णयामुळे मनोरंजन, चित्रपट क्षेत्राला मोठा दिलासा मिळाला आहे, असे सांस्कृतिक कार्यमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी सांगितले.कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओ टी टी यांच्या चित्रीकरणासंदर्भात राज्य शासनाने मार्गदर्शक तत्वे ३० मे २०२० रोजी जारी केलेले आहे.या मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी करताना संबंधित संस्था/संघटना यांना काही अडचणी येत होत्या. त्यामुळेच सांस्कृतिक विभागामार्फत ३० मे २०२० रोजी निर्गमित करण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्वांबाबतचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओ टी टी यांना ३० मे २०२० च्या शासन निर्णयानुसार चित्रीकरणासाठी परवानगी देण्यात आली आहे. सदर चित्रीकरणाची परवानगी राज्य शासनाने तयार करून दिलेल्या एस ओ पी (मार्गदर्शक तत्वे) नुसार असेल. लॉकडाउन पूर्वी चित्रीकरणासाठी शासनाची परवानगी घेण्याची पद्धत यापुढेही तशीच असणार आहे.लॉकडाउन पूर्वी ज्या पद्धतीने आरक्षण आणि चित्रीकरणाची परवानगी घेण्यात येत होती त्याच पद्धतीने आताही तीच पद्धत असणार आहे

  By Pune Metro| 11 views

 • नगरला थ्री स्टार मानांकन,स्वच्छ शौचालये व कचरा मुक्त शहर ही असणार नगरची नवी ओळख

  नगरला थ्री स्टार मानांकन,स्वच्छ शौचालये व कचरा मुक्त शहर ही असणार नगरची नवी ओळख

  : केंद्र सरकारच्या स्वच्छता अभियानांतर्गत कचरा मुक्त शहराच्या स्पर्धेत अहमदनगर शहराला थ्री स्टार मानांकन मिळाले आहे. नगर शहर म्हटले की डोळ्यासमोर अस्वच्छता खराब रस्ते असे चित्र उभे राहायचे.यामुळे नगरला सुधारित खेडे असे उपहासाने शहराबाहेरील लोक म्हणत. मात्र गेल्या आठ महिन्यापासून नगर शहराने स्वतःची ओळख बदलली आहे. स्वच्छ शौचालये व कचरा कुंडली मुक्त शहर अशी नवी ओळख नगर शहराने मिळवली आहे,या नव्या ओळखीमुळे नगर शहराच्या पदरात केंद्राकडून 15 ते 25 कोटी रुपयांचे बक्षीस मिळणे निश्‍चित झाले आहे. अहमदनगर शहराला स्वच्छतेचा थ्री स्टार मिळाल्याची बातमी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी आज सकाळीच दूरध्वनी करून महापौर बाबासाहेब वाकळे यांना दिली.तसेच वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांनाही द्विवेदी यांनी दुरध्वनी करून अभिनंदन केले. प्रामाणिकपणे केलेले प्रयत्न आणि स्वच्छता, आरोग्य यासाठी मनापासून काम केले. त्यासाठी सर्वांनी योगदान दिले. जागृती केली.त्यामुळे अहमदनगरला स्वच्छतेचा थ्री स्टार मिळाला. यामुळे शहराच्या विकासाला १५ ते २५ कोटी रुपयांचा भरीव निधी मिळणार आहे. हा निधी शहराचे आरोग्य सुधारण्यासाठी, तसेच शहर कचरामुक्त करण्यासाठी उपयोगात आणू अशी प्रतिक्रिया महापौर बाबासाहेब वाकळे यांनी दिली.जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी या मोहिमेला गती दिली. महापौर बाबासाहेब वाकळे यांनी शहर स्वच्छ करण्यासाठी परिश्रम घेतले. याबरोबरच सर्वच सदस्य , नगरसेवक , अधिकारी , पदाधिकारी आदींचे यात मोलाचे सहकार्य आहे.

  By Pune Metro| 8 views

 • प्रियंका गांधीच विरोधकांना झणझणीत उत्तर,मी इंदिरा गांधीची नात आहे, जी कारवाई करायची आहे ती करा

  प्रियंका गांधीच विरोधकांना झणझणीत उत्तर,मी इंदिरा गांधीची नात आहे, जी कारवाई करायची आहे ती करा

  गेल्या काही महिन्यांमध्ये करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेली परिस्थिती हाताळण्यात उत्तर प्रदेश सरकारला अपयश येत असल्याची टीका प्रियांका गांधी वारंवार करत होत्या. यानंतर काही भाजपा नेत्यांकडून गांधी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी होत होती. त्याला उत्तर देताना प्रियांका गांधी यांनी, मी इंदिरा गांधीची नात आहे, जी कारवाई करायची आहे ती करा अशा शब्दांत सुनावलं आहे. माझ्यावर जी कारवाई करायची आहे ती करा, मी सत्य बोलतच राहीन, अशा शब्दांत काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी उत्तर प्रदेश सरकारला खडसावले आहे.
  जनतेची सेवक या नात्याने माझी लोकांशी बांधिलकी आहे.

  By Pune Metro| 6 views

 • सीना नदीला पूर,नागरिकांची पाणी पाहण्यासाठी गर्दी

  सीना नदीला पूर,नागरिकांची पाणी पाहण्यासाठी गर्दी

  अहमदनगर शहरासह ग्रामीण भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील नद्या वाहत्या झाल्या आहेत. काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे अहमदनगर शहरातील सीना नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. पाण्याच्या प्रवाहामुळे नदीवरील छोटे-मोठे पूल पाण्याखाली गेले आहेत. एक प्रकारे नदीला पूर आला आहे, अशी प्रतिक्रिया नदी लगत शेती असलेल्या शेतकऱ्यांनी व्यक्त केली. सीना नदी दुथडी भरून वाहू लागल्याने, वाहते पाणी पाहण्यासाठी नगरकरांनी नदी किनारी गर्दी केली होती.
  दरम्यान मुंबई हवामान विभागाने पुढील तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.
  आजही मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. अहमदनगर, पुणे आणि नाशिक येथे मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे नदी लगत असलेल्या गावांनी सतर्क राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.  a

  a  <

  By Pune Metro| 11 views

 • इंदुरीकर महाराजांवर संगमनेरमध्ये गुन्हा दाखल,अंधश्रद्धा निर्मुलन समितीने दिली नोटीस

  इंदुरीकर महाराजांवर संगमनेरमध्ये गुन्हा दाखल,अंधश्रद्धा निर्मुलन समितीने दिली नोटीस

  प्रसिद्ध समाजप्रबोधनकार निवृत्ती देशमुख उर्फ इंदुरीकार महाराज यांच्यावर अहमदनगरमधील संगमनेर कोर्टात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गर्भधारणापूर्व आणि प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान प्रतिबंधक (PCPNDT) कायद्याअंतर्गत इंदुरीकर महाराजांविरोधात गुन्हा दाखल झालाय,इंदुरीकर महाराजांवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशा मागणीची नोटीस अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या बुवाबाजी संघर्ष विभागाच्या सचिव अॅड. रंजना गवांदे यांनी अहमदनगरच्या जिल्हा शल्य चिकित्सक अधिकाऱ्यांना 17 फेब्रुवारीला बजावली होती. मात्र, ती तक्रार दाखल करून घेण्यात आली नव्हती. त्यानंतर गवांदे यांनी 27 फेब्रुवारी 2020 रोजी कोर्टामार्फत नोटीस दिली. कोर्टात दावा दाखल झाल्यानंतर अखेर 19 जून ला इंदुरीकरांविरोधात संगमनेर मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.  a

  a


  By Pune Metro| 13 views

 • जैन साध्वी श्री नमिताश्रीजी महाराज यांच चातुर्मासासाठी कर्जतला आगमन

  जैन साध्वी श्री नमिताश्रीजी महाराज यांच चातुर्मासासाठी कर्जतला आगमन

  - चातुर्मासासाठी जैन साध्वी पूज्य श्री नमिताश्रीजी महाराज यांचे आज दि 25 जून रोजी कर्जत मध्ये आगमन झाले.
  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जैन साधु, साध्वीजी यांना चातुर्मास ठरविलेल्या ठिकाणी पायी जाणे शक्य झाले नाही, त्यामुळे गेली तीन महिन्यापासून काही साधू, साध्वीजी करमाळा येथे होत्या. यातील प. पू. नमिताश्रीजी महाराज व प. पु. सजगश्रीजी महाराज यांचा चातुर्मास कर्जत येथे होणार असून त्यांनी काही दिवस राशीन येथे थांबून आज कर्जत येथे सुरक्षित अंतर ठेवत चातुर्मासासाठी प्रवेश केला. यावेळी कर्जत जैन श्रावक संघाचे अध्यक्ष अँड अशोक कोठारी, उपाध्यक्ष सचिन बोरा, अँड दीपक भंडारी, सुरेश भंडारी, किरण बोथरा, माणिकचंद कोठारी, आशिष बोरा, भूषण देसरडा, यश नहार, आदी सह महिला उपस्थित होत्या.
  कर्जत येथील अँड दिपक भंडारी यांच्या निवासस्थानी या साध्वीजी दिनांक १ जुलै पर्यंत राहणार असून एक जुलै रोजी त्यांचा चातूर्माससाठी कर्जत शहरात प्रवेश होईल चातुर्मासा दरम्यान कोरोनाची परिस्थिती पाहून व वरिष्ठ आचार्य श्री शिवमुनींजीचे मार्गदर्शन मिळेल त्याप्रमाणे पुढील निर्णय घेतला जाईल असे यावेळी जाहीर करण्यात आले.
  a


  By Pune Metro| 8 views

 • मिरजगाव मध्ये दरोडा ,३ लाखाचे दागिने चोरून नेणाऱ्या दरोडेखोरांना जेरबंद करण्यात पोलिसांना यश

  मिरजगाव मध्ये दरोडा ,३ लाखाचे दागिने चोरून नेणाऱ्या दरोडेखोरांना जेरबंद करण्यात पोलिसांना यश

  - तालुक्यातील मिरजगाव येथे दरोडा टाकून जीवे ठार मारण्याची धमकी देत, ३ लाखाचे दागिने चोरून नेणाऱ्या दरोडेखोरांना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. स्थानिक गुन्हे शाखा व कर्जत पोलीसांनी संयुक्त कारवाई केली आहे.
  याबाबत सविस्तर हकीगत अशी की, दि. २३ जून रोजीचे रात्री मधुकर विठ्ठल कोरडे मिरजगाव हे त्यांचे पत्नीसह घरामध्ये झोपलेले असतांना अनोळखी गुन्हेगारांनी घराचे किचनच्या दरवाज्याचा कडी कोयंडा तोडुन घरामध्ये घुसून फिर्यादी व त्यांचे पत्नीला तलवारीचा धाक दाखवून व जिवे ठार मारण्याची धमकी देवून घरातील कपाटामध्ये असलेले ३ लाख ५०० रु . किमतीचे दागिणे चोरुन नेले


  a

  a  By Pune Metro| 7 views

 • महाराष्ट्र कंत्राटी वीज कामगार संघाचा महावितरणच्या भरती प्रक्रियेच्या निषेध

  महाराष्ट्र कंत्राटी वीज कामगार संघाचा महावितरणच्या भरती प्रक्रियेच्या निषेध

  महावितरण मधील कंत्राटी कामगारांना भरतीमध्ये प्राधान्य न देता भरती केल्यामुळे महावितरणचे कंत्राटी कामगार यांनी आज पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकत्र येऊन महाराष्ट्र शासन आणि वीज कंपनी प्रशासनाचा जाहीर निषेध केला .

  जमलेल्या कंत्राटी कामगारांनी शासनाविरोधात आणि संबंधित मंत्र्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली .

  यावेळी संबंधित कंत्राटी कामगारांनी भरती  प्रक्रियेच्या फॉर्मची होळी करून जाहीर निषेध केला

  Watch महाराष्ट्र कंत्राटी वीज कामगार संघाचा महावितरणच्या भरती प्रक्रियेच्या निषेध With HD Quality

  By Pune Metro| 72 views

 • करोनाचा राज्यात हाहाकार, दहीहंडी उत्सवाबाबत झाला मोठा निर्णय, गोविंदा यंदा घरीच

  करोनाचा राज्यात हाहाकार, दहीहंडी उत्सवाबाबत झाला मोठा निर्णय, गोविंदा यंदा घरीच

  जान  है तो जहाँन हैं  असे म्हणत यंदाचा दहीहंडी उत्सव रद्द करण्याचा निर्णय महाराष्ट्रातील 'दहीहंडी समन्वय समितीच्या वतीने घेण्यात आलाय. करोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित वावराबाबतचा नियम पाळणे अशक्य असल्याने यंदाचा दहीहंडी उत्सव रद्द करण्यात येत असल्याचे 'दहीहंडी समन्वय समिती- महाराष्ट्र 'तर्फे जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे करोना संकटाने आणखी एका वैभवशाली उत्सवात खंड पडणार आहे ,आणि मुंबईकरांना आणखी एका मोठ्या उत्सवाला मुकावं लागणार आहे. अष्टमीची पूजा म्हणजेच श्रीकृष्णाचा जन्मसोहळा साध्या पद्धतीने साजरा करण्याची सूचना विभागीय पोलिस अधिकाऱ्यांनी केली आहे. तसेच मंडळांची आर्थिक बाजू, आयोजक, सुरक्षित वावराबाबतचे नियम यामुळे दहीहंडी उत्सव रद्द करण्याचा निर्णय बुधवारी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला. मागील अनेक वर्षांपासून दहीहंडी आयोजनामध्ये अनेक अडचणी येत आहेत. मात्र राज्यभरातील गोविंदा पथके आणि समन्वय समितीच्या लढ्याअंती दरवर्षी हा सण उत्साहात पार पडत होता. यंदा करोनामुळे मुंबईतील गोविंदा उत्सवाबाबत अनिश्चितता होती. त्यामुळे मुंबईतील गोविंदा पथकांचे लक्ष समन्वय समितीच्या निर्णयाकडे लागले होते. मात्र यंदाच्या वर्षी करोनामुळे राज्याचे स्वास्थ्य बिघडले असताना दहीहंडी उत्सवाचे आयोजन करून गोविंदांचा जीव धोक्यात घालणे योग्य नाही, असा सूर पदाधिकाऱ्यांनी लावला.

  Watch करोनाचा राज्यात हाहाकार, दहीहंडी उत्सवाबाबत झाला मोठा निर्णय, गोविंदा यंदा घरीच With HD Quality

  By Pune Metro| 44 views

 • राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पुण्यात आंदोलन, पवार यांच्याबद्दल केलेल्या विधानांचे पडसाद राज्यात उमटले

  राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पुण्यात आंदोलन, पवार यांच्याबद्दल केलेल्या विधानांचे पडसाद राज्यात उमटले

  ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधाने करणारे भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांचा पुतळा जाळून पुण्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या  कार्यकर्त्यांनी  त्यांचा निषेध केला. पडळकर यांनी पंढरपूरमध्ये पवार यांच्याबद्दल केलेल्या विधानांचे पडसाद राज्यात ठिकठिकाणी उमटले. पुण्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी महात्मा फुले मंडईत लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्यासमोर आंदोलन केले. भाजप मुर्दाबादच्याही घोषणा यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी दिल्या. पक्षाचे जयदेव गायकवाड, अंकुश काकडे, रविंद्र माळवदकर, राजलक्ष्मी भोसले, बाबुराव चांदेरे,  प्रदीप देशमुख, शशिकला कुंभार आणि कार्यकर्त्यांनी भाग घेतला. या वेळी कार्यकर्त्यांनी पडळकर यांच्या पुतळ्याला चपलांचा हार घालून निषेधांच्या घोषणांच्या निनादात तो जाळला. या प्रसंगी भाजपची राजकीय संस्कृती काय आहे, ते पक्षाने पडळकर यांच्या माध्यमातून दाखवून दिले आहे. पडळकर हे प्यादे असून त्याचा बोलवता धनी भाजपच आहे. शरद पवार यांची उंचीही भाजपच्या नेत्यांना माहिती नाही. त्यामुळे ते असे उद्योग करीत आहेत. यातून भाजपच्या राजकारणाचा खालावलेला दर्जा उघड झाला आहे, अशी भावना गायकवाड, काकडे, माळवदकर आणि देशमुख यांनी भाषणात व्यक्त केली. या प्रसंगी कडेकोट पोलिस बंदोबस्त होता तसेच सोशल डिन्स्टन्सिंगचे नियम पाळून कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केलय.

  Watch राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पुण्यात आंदोलन, पवार यांच्याबद्दल केलेल्या विधानांचे पडसाद राज्यात उमटले With HD Quality

  By Pune Metro| 92 views

 • जिल्ह्यात एकूण २१ व्यक्ती बाधित, जिल्ह्यातील ॲक्टिव रुग्णांची संख्या ८२

  जिल्ह्यात एकूण २१ व्यक्ती बाधित, जिल्ह्यातील ॲक्टिव रुग्णांची संख्या ८२

  जिल्ह्यातील ६ रुग्ण बरे होऊन आज घरी परतले. यामुळे जिल्ह्यात कोरोना संसर्गाा बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या आता २६० इतकी झाली आहे. तर आज जिल्ह्यात एकूण २१ व्यक्ती बाधित आढळून आल्या. याशिवाय, खाजगी प्रयोगशाळेत बाधित आढळलेल्या ५ रुग्णांची भर या रुग्ण संख्येत पडली आहे. यामुळे जिल्ह्यातील ॲक्टिव रुग्णांची संख्या ८२ झाली आहे
  *सकाळी जिल्ह्यात १२ रुग्ण बाधित आढळून आले तर सायंकाळी यामध्ये आणखी ९ रुग्णांची भर पडली.

  Watch जिल्ह्यात एकूण २१ व्यक्ती बाधित, जिल्ह्यातील ॲक्टिव रुग्णांची संख्या ८२ With HD Quality

  By Pune Metro| 61 views

 • तपोवन रत्स्याच्या कामात त्रुटी, पहिल्याच पावसात खचला रस्ता, बारस्कर यांनी केली तक्रार

  तपोवन रत्स्याच्या कामात त्रुटी, पहिल्याच पावसात खचला रस्ता, बारस्कर यांनी केली तक्रार

  अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर तीन कोटींच्या पवन रस्त्यांचे काम सुरु करण्यात आलं होत, मात्र पहिल्याच पावसात रास्ता खचत असल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेते संपत बारस्कर यांनी रस्त्याचे काम निकृष्ट झाल्याबाबत तक्रार केली  होती, या रस्त्याची अधिकाऱ्यांनी पाहणी करून मनपाच्या कामात त्रुटी आढळल्याचे  मान्य  केलं  आहे. तसेच कामातील त्रुटी ताटाकल दूर करण्याचा निर्णय देखील घेतला आहे. तपोवन  रस्त्याची लांबी .. किमी आहे, या रस्त्याचे डांबरीकरण आणि मजबुतीकरण कामासाठी ३ कोटी १५ लाख ५८ हजार खर्च   केले जाणार आहेत. रस्त्याचं काम सुरु असलं तरी पहिल्याच पावसात रस्ता खचला आहे. त्यामुळे संपत बारस्कर यांनी आंदोलनाचा इशारा सुद्धा दिलाय. यावेळी या प्रकरणाबाबत अधिक माहिती नगरसेवक संपत बारस्कर आणि बाळासाहेब पवार यांनी दिलीय. प्रसंगी नरसेवक विनीत पाऊलबुद्धे ,सुनील त्रिम्बके, निखिल वारे, डॉक्टर सागर बोरुडे यावेळी उपस्थित होते.

  Watch तपोवन रत्स्याच्या कामात त्रुटी, पहिल्याच पावसात खचला रस्ता, बारस्कर यांनी केली तक्रार With HD Quality

  By Pune Metro| 54 views

 • नगरमध्ये पुन्हा कोरोना अलर्ट नेताजी सुभाष चौक, नालेगाव, सिद्धार्थ नगर तोफखाना सील

  नगरमध्ये पुन्हा कोरोना अलर्ट नेताजी सुभाष चौक, नालेगाव, सिद्धार्थ नगर तोफखाना सील

  काल  नगर शहरातील तोफखाना भागातील ८०, ५९ वर्षीय पुरुष आणि बावीस वर्षाच्या युवकाला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होत,  याशिवाय नगर शहरातीलच सिद्धार्थ नगर भागातील आठ वर्षाची मुलगी, ३२ वर्षीय युवक, तीस वर्षीय महिला,  २५ वर्षीय युवक यांचा अहवाल हि पॉझिटिव आला ,तसेच नालेगाव येथील वाघ गल्ली मधील  बावीस वर्षीय युवकही बाधित आढळून आला होता त्यामुळे जिल्ह्यात एकाच दिवशी कोरोनाचे २४ रुग्ण सापडल्याने शहरात एकच खळबळ उडाली असून चिंतेचं वातावरण तयार झालं आहे. त्यामुळे  नगरमधील  कापड बाजारातील  दुकाने सुद्धा बंद करण्यात आली आहेत. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी  सिद्धार्थनगर भागात जाऊन तातडीने प्रतिबंधात्मक योजना लागू करण्याचे आदेश दिलेत. त्यामुळे प्रशासनाकडून याची दखल घेत  शहरातील तोफखाना , नेताजी सुभाष चौक असे काही भाग सीलबंद करण्यात आले आहेत, त्यामुळे आता पुन्हा एकदा नगरमधल्या नागरिकांची चिंता वाढली असून त्यांना घराबाहेर पडणे आता अवघड झालं आहे

  Watch नगरमध्ये पुन्हा कोरोना अलर्ट नेताजी सुभाष चौक, नालेगाव, सिद्धार्थ नगर तोफखाना सील With HD Quality

  By Pune Metro| 9 views

 • पीपल्स हेल्पलाईनच्यावतीने वेबीनार घेऊन शाहू महाराजांना लोकभज्ञाक शासकरत्न ही राष्ट्रीय मानवंदना दिली

  पीपल्स हेल्पलाईनच्यावतीने वेबीनार घेऊन शाहू महाराजांना लोकभज्ञाक शासकरत्न ही राष्ट्रीय मानवंदना दिली

  भारत देश पारतंत्र्यात असताना शाहू महाराजांनी पुरोगामी विचाराने अनेक कल्याणकारी निर्णय घेतले. दलितांना आरक्षण दिले, शेतकर्‍यांना आधार दिला तर राधानगरी सारखे धरणे बांधले. मात्र सध्या स्वातंत्र्य असून देखील कोरोना महामारीच्या खाईत सर्वसामान्य जनता ढकलली जात आहे. आजची परिस्थिती तमसपर्वासारखी झाली असून, शासनकर्ते, लोकप्रतिनिधी, न्याय व्यवस्था, सरकारी अधिकारी बिळात दडून बसले आहेत. जेंव्हा सर्वसामान्यांना त्यांच्या आधाराची गरज पडत आहे. ते आपली जबाबदारी झटकत आहे. यामुळे देशात आर्थिक संकट उभे राहून, सर्वसामान्यांना रोजी-रोटी व न्यायापासून वंचित रहावे लागत आहे. आजच्या परिस्थितीमध्ये शाहू महाराजांचे विचार व कार्यप्रणाली अंगीकारण्याची गरज असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. ही मानवंदना देण्यासाठी अ‍ॅड. गवळी, प्रा. कॉ.महेबुब सय्यद, माजी कुलगुरु सर्जेराव निमसे, कॉ.बाबा आरगडे, अशोक सब्बन, सुधीर भद्रे, प्रकाश थोरात, जालिंदर बोरुडे, ओम कदम, शाहीर कान्हू सुंबे, हिराबाई ग्यानप्पा यांनी पुढाकार घेतला आहे.

  Watch पीपल्स हेल्पलाईनच्यावतीने वेबीनार घेऊन शाहू महाराजांना लोकभज्ञाक शासकरत्न ही राष्ट्रीय मानवंदना दिली With HD Quality

  By Pune Metro| 8 views

Featured Videos

 • Haasya Kavi Sammalen (हास्य कवि सम्मलेन) - Performance 2 at 37th India International Trade Fair 2017

  Haasya Kavi Sammalen (हास्य कवि सम्मलेन) - Performance 2 at 37th India International Trade Fair 2017

  Watch Haasya Kavi Sammalen (हास्य कवि सम्मलेन) - Performance 2 at 37th India International Trade Fair 2017 with HD video.

  By India Trade Promotion Organisation (ITPO)| 80855 views

 • भारत में कोरोना विष्फोट, आने वाले दिनों में स्थिति भयावह के संकेत || Divya Delhi News

  भारत में कोरोना विष्फोट, आने वाले दिनों में स्थिति भयावह के संकेत || Divya Delhi News

  you need to do is PRESS THE BELL ICON next to the Subscribe button! Divya Delhi News is India's leading Youtube Channel. Divya Delhi News YouTube channel offers latest news videos on Politics, Business, Cricket, Bollywood, Lifestyle, Auto, Technology, Travel, Entertainment and a lot more. Stay tuned for latest updates and in-depth analysis of news from India and around the world!All For New coverage and programs please contact us on below mobile no.- 9873104569Follow us: Official website: https://www.divyadelhi.com/Facebook: https://www.facebook.com/divyadelhien... https://twitter.com/divyadelhilive

  Watch भारत में कोरोना विष्फोट, आने वाले दिनों में स्थिति भयावह के संकेत || Divya Delhi News With HD Quality

  By Divya Delhi| 490 views

 • Tim Southee praises Jasprit Bumrah, calls him ‘world class bowler’

  Tim Southee praises Jasprit Bumrah, calls him ‘world class bowler’

  Tim Southee praises Jasprit Bumrah, calls him ‘world class bowler’

  #catchnews #CatchNewsToday

  For more videos, subscribe to our channel: https://goo.gl/bkDSLj
  Check out Catch News for more news: http://www.catchnews.com/

  Follow Catch News here -
  Facebook:https://bit.ly/2xD3NKZ
  Twitter: https://bit.ly/2NG3rhr
  Instagram: https://bit.ly/30mh2vE
  --------------------------------------------------------------------------------------------
  Also, Follow Catch in Hindi: http://hindi.catchnews.com/

  Catch is a contemporary new digital platform about the ideas and events shaping the world. It aims to filter and provide news-on-the-run for an impatient new generation. It offers greater insight for influencers and the deeper consumer of news. When opinions are shrill and polarized, we hope to create a middle ground and build bridges. When there is a set thinking, we hope to stand apart and go against the wind. The world is complex, exciting, layered, evolving, always interesting. We hope to be the same.

  Lots of videos and lots more in the pipeline. Stay tuned.Watch Tim Southee praises Jasprit Bumrah, calls him ‘world class bowler’ With HD Quality

  By Catch News| 1139 views

 • India - USA Trade Statistics

  India - USA Trade Statistics

  Comparative Trade Statistics for the Years 2013 & 2014
  (Top 25 Products)Watch India - USA Trade Statistics With HD Quality

  By Indian Trade Portal| 76766 views

 • New Age Parenting | Episode 1 | Curtain Raiser | Part 1 | Ms. Kanu Priya, Conflict Management Expert

  New Age Parenting | Episode 1 | Curtain Raiser | Part 1 | Ms. Kanu Priya, Conflict Management Expert

  New Age Parenting is an Indian Television series dealing with the need-of the hour topic, which is parenting and is working towards finding solutions for various conflicts which exist and weaken the existing Parent-Child bond.

  It is conceived and hosted by Ms.Kanu Priya, Conflict Management Expert .

  Watch every Sat @3:30 PM & Sun @4:30 PM only on Headlines Today

  Watch New Age Parenting | Episode 1 | Curtain Raiser | Part 1 | Ms. Kanu Priya, Conflict Management Expert With HD Quality

  By New Age Parenting| 6429 views

 • Batting is real challenge of international games: Kane Williamson

  Batting is real challenge of international games: Kane Williamson

  hristchurch (New Zealand): New Zealand beat India by 7 wickets in the second Test match. They won the series by 2-0 on March 02 in Christchurch. While addressing the post match press conference, the New Zealand Cricket Team Skipper Kane Williamson said, “Batting is a real challenge of the international game and I enjoy these challenges. We are trying to adapt situation from one country to another as per the circumstances in different formats of the game. It is quite relevant for us”.

  #catchnews #CatchNewsToday

  For more videos, subscribe to our channel: https://goo.gl/bkDSLj
  Check out Catch News for more news: http://www.catchnews.com/

  Follow Catch News here -
  Facebook:https://bit.ly/2xD3NKZ
  Twitter: https://bit.ly/2NG3rhr
  Instagram: https://bit.ly/30mh2vE

  By Catch News| 1498 views

 • New Age Parenting | Ep 8 (Part 1) | Teenage Relationship | Ms. Kanu Priya | Geetika Dhama

  New Age Parenting | Ep 8 (Part 1) | Teenage Relationship | Ms. Kanu Priya | Geetika Dhama

  New Age Parenting is an Indian Television series dealing with the need-of the hour topic, which is parenting and is working towards finding solutions for various conflicts which exist and weaken the existing Parent-Child bond.

  It is conceived and hosted by Ms.Kanu Priya, Conflict Management Expert .

  Watch every Sat @3:30 PM & Sun @4:30 PM only on Headlines Today

  Watch New Age Parenting | Ep 8 (Part 1) | Teenage Relationship | Ms. Kanu Priya | Geetika Dhama With HD Quality

  By New Age Parenting| 5777 views

 • PM Narendra Modi ने China को दी सख्त चेतावनी, कहा- अगर भारत की तरफ आँख भी उठाया तो... | Mann Ki Baat

  PM Narendra Modi ने China को दी सख्त चेतावनी, कहा- अगर भारत की तरफ आँख भी उठाया तो... | Mann Ki Baat

  Conveying condolences to the kin of Army personnel who lost their lives in the Galwan valley clash, Prime Minister Narendra Modi on Sunday said that the sacrifice of these families is “worth worshipping”.
  “Martyr Kundan Kumar’s father from Bihar said that he will send his grandsons also to the armed forces to protect the country. This is the spirit of every martyr’s family. The sacrifice of these families is worth worshipping,” the Prime Minister said during the 66th episode of his monthly-radio programme Mann Ki Baat.
  “The inner sense of pride that families feel on the supreme sacrifice of their brave sons and their sentiment for the country constitutes the true power and the might of the country,” he added.
  He asserted that a befitting reply has been given to those coveting our territories in Ladakh.
  “The world has seen India’s strength and commitment to peace. If India knows how to celebrate friendship, India also knows how to give a befitting reply when provoked. In Ladakh, a befitting reply has been given to those coveting our territories,” he said.
  The Prime Minister further said that India bows to the brave martyrs and their valour will always be remembered. This is the first address of the monthly programme ‘Mann Ki Baat’ after the face-off in Ladakh.
  As many as 20 Indian soldiers lost their lives in a violent face-off in the Galwan Valley after an attempt by the Chinese troops to unilaterally change the status quo during the de-escalation in eastern Ladakh.
  Indian intercepts have revealed that the Chinese side suffered 43 casualties including dead and seriously injured in the clash

  #PMModi #MannKiBaat #China

  आपको यह वीडियो कैसा लगा। हमें अपनी प्रतिक्रियाएं व सुझाव के लिए कमेंट बॉक्स में लिखें। Newsroompost पर अपडेट वीडियोज के लिए बेल आइकन पर क्लिक करें और हमारे चैनल को सब्सक्राइब करें।

  Follow us on:

  Web:

  English: https://newsroompost.com/

  Hindi: https://hindi.newsroompost.c

  By NewsRoom Post| 1029 views