खोज वीडियो: #sujay

  • खासदार विखे यांनी घेतली पदाधिकाऱ्यांची बैठक

    नगरच्या जिल्हा परिषद मध्ये आज अधिकारी तसेच पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीला खासदार सुजय विखे ,पंचायत समितीचे सभापती रामदास भोर, सुजित झावरे सदस्य, अनिल कराळे, , जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, आदींसह शिक्षण, कृषी, बांधकाम विभागातील प्रमुख अधिकारी यावेळी उपस्थित होते.यावेळी खासदार विखे म्हणाले की, ज्या ठिकाणी भूसंपादन रस्त्यांची कामे सुरू आहे, त्या लाभार्थ्यांच्या बरोबर बैठक घेऊन हा विषय मार्गी लावेल, त्याचप्रमाणे शाळांसाठी जिल्ह्यामध्ये 100 कोटींची आवश्यकता आहे एक वर्षात हा निधी उपलब्ध होऊ शकतो त्यासाठी सर्व लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करणे आवश्यक आहे.आगामी काळामध्ये स्थानिक पातळीवर येणाऱ्या प्रश्नांची सोडवणूक करण्याकरिता एकत्रपणे काम होणे गरजेचे आहे. त्याकरिता केंद्र सरकार असो अथवा राज्य सरकार किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेतील अधिकारी असून त्यांचा समन्वय राखला गेला पाहिजे. त्या अनुषंगाने आता सर्व अधिकाऱ्यांचा समन्वय ठेवून संबंधित गावांमध्ये यांची एकत्र बैठक कशा पद्धतीने होईल याचे नियोजन आगामी काळामध्ये निश्चितपणे केले जाईल असे खासदार डॉ. विखे यांनी म्हटले आहे.अनेक मुद्द्यणवर त्यांनी चर्चा केलीय.

    Watch खासदार विखे यांनी घेतली पदाधिकाऱ्यांची बैठक With HD Quality

    द्वारा Metro News | 231 दृश्य

  • " ऐ मेरे हमसफर " ने रसिक हरवले ऐंशीच्या दशकात

    ऐंशीच्या दशतकातील अवीट गोडीची गाणी त्याला साजेसे संगीत आणि सोबत सुरेल आवाज ऐ मेरे हमसफर या कार्यक्रमाने या निवडणुकीच्या रणधुमाळीत रसिक मंत्रमुग्ध झाले आणि वन्समोर मागणीने आणि टाळ्यांच्या कडकडाटाने रसिकांनी माऊली सभागृहात अक्षरश डोक्यावर घेतले होते येथील कलाविश्व कल्चरल
    फाउंडेशन निर्मित आणि स्वरझंकार प्रस्तुत ऐंशीच्या दशतकातील अविस्मरणीय गीतांचा कार्यक्रम ऐ मेरे हमसफर शनिवारी दिनांक 19 ऑक्टोंबर रोजी सावेडी येथील माउली सभागृहात संध्याकाळी सहा वाजता मोठ्या उत्साहात संपन्न झाला तर यावेळी हिंदी मराठी चित्रपटांचे गाणी यावेळी रसिकांनी ऐकण्याचा आनंद घेतलाय यावेळी
    कार्यक्रमाचे उद्घाटन उपजिल्हाधिकारी गुलाबराव खरात महापालिका उपयुक्त सुनिल पवार यांच्या उपस्थितीत आणि अभिनेते क्षीतीज झावरे अखिल भारतीय मराठी चित्रपट मंडळाचे अहमदनगर जिल्हा सर्व विभाग प्रमुख शशिकांत नजान,सहाय्यक आयुक्त मेहेर लहारे,सार्वमत चे शाखा व्यवस्थापक महेश गीते,राहुल भिंगारदिवे,नगर टाईम्स चे कार्यकारी संपादक संदीप रोडे,यांच्यासह धीरज मुनोत,अमित कोठारी,डॉक्टर रावसाहेब बोरुडे,जावेद शेख, संगीता जाधव,बाबासाहेब मुकिंदे,तुषार चोरडिया, रियाज पठाण उद्धव काळापहाड डॉक्टर रेश्मा चेडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले याप्रसंगी अनेक रसिकांनी उपस्थिती लावली होती


    Watch " ऐ मेरे हमसफर " ने रसिक हरवले ऐंशीच्या दशकात With HD Quality

    द्वारा Metro News | 318 दृश्य

  • बन्सी महाराज मिठाईवाले दिवाळीसाठी सज्ज,विविध प्रकारच्या मिठाईची दुकानात गजबज

    दिवाळी येन तोंडावर येवून ठेपली आहे, नगरची बाजारपेठ देखील गर्दीने भरली असल्याचे पाहायला मिळाली आहे, दिवाळी हा भारतीय सणांपैकी एक महत्वाचा सॅन आहे, याच सणाच्या निमित्ताने सावेडीतील बन्सी महाराज मिठाईवाले दुकानात विविध प्रकारच्या मिठाई उपलबद्ध करून देण्यात आली आहे. वेगवेगळ्या प्रकारची स्वादिष्ट मिठाईने हे दुकान अगदी नटून गेल्याचे चित्र पाहायला मिळालाआहे.


    Watch बन्सी महाराज मिठाईवाले दिवाळीसाठी सज्ज,विविध प्रकारच्या मिठाईची दुकानात गजबज With HD Quality

    द्वारा Metro News | 498 दृश्य

  • मॉल आणि रिटेल शॉपमध्ये पेट्रोल विक्रीला मिळणार परवानगी

    आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोदी सरकार अनेक मोठे आणि महत्त्वाचे निर्णय घेण्याची शक्यता आहे. या निर्णयांमध्ये पेट्रोलपंपांबाबतच्या निर्णयाचा समावेश असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. केंद्र सरकार मोठे शॉपिंग मॉल्स आणि रिटेल दुकानांमध्ये पेट्रोल आणि डिझेलची विक्री करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. या बरोबरच खासगी पेट्रोलपंपाबाबतही मोठा निर्णय होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. केंद्र सरकारशी संबंधीत सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, सरकार २००० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीऐवजी आता २०० कोटीचे एकूण मूल्य असणाऱ्या कंपन्यांना पेट्रोलपंप सुरू करण्याची परवानगी देऊ शकते. या बरोबरच पेट्रोलपंप सरू करण्यासंबंधी इतर नियमांमध्येही बदल होण्याची शक्यता आहे. शिवाय एखादी कंपनी पेट्रोलियम सेक्टरमध्ये व्यवसाय करत नसली, तरी देखील अशा कंपनीला इंधन रिटेल परवाना मिळू शकणार आहे.सरकारने पेट्रोल-डिझेल विक्रीबाबत असा निर्णय घेतल्यास नवे नियम नेमके कसे असतील, याबाबतचा तपशील स्पष्ट होण्यासाठी काही काळ वाट पाहावी लागणार आहे. हेम्लेट असेल तर पेट्रोल मिळणे किंवा प्लास्टिक बाटलीत पेट्रोल-डिझेल न देणे अशा काही नियमांचा यात समावेश आहे.


    Watch मॉल आणि रिटेल शॉपमध्ये पेट्रोल विक्रीला मिळणार परवानगी With HD Quality

    द्वारा Metro News | 401 दृश्य

  • नगर आणि पारनेरमध्ये पावसाचा जोर कायम मुळा धरणाचे ११ दरवाजे उघडले

    अहमदनगर जिल्हा आणि जिल्ह्याच्या अनेक भागात मंगळवारी सलग चौथ्या दिवशी परतीच्या पावसाचा जोर कायम होता, सोमवारी मध्यरात्रीपासून शहर आणि परिसरात जोरदार पावसाला सुरवात झाली होती. गेल्या २४ तासात नगर आणि पारनेर तालुक्याला पावसाने झोडपून काढल आहे, परतीच्या पावसामुळे बाजरी मका, या पिकांचे नुकसान झालं आहे, आत्तापर्यंत जिल्ह्यात १३३ टक्के पाऊस झाला असून,मंगळवारी मुळा धरणाच्या ११ दरवाजातून पाणी सोडण्यात आलं आहे, नगर शहर आणि जिल्ह्यात शुक्रवारी मध्यरात्रीपासून पार्टीच्या पावसाला जोरदार सुरवात झाली होती. शनिवारी जिल्ह्याच्या अनेक भागात दिवसभर रिमझीम पाऊस सुरु होता,रविवारी जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरु झाला.


    Watch नगर आणि पारनेरमध्ये पावसाचा जोर कायम मुळा धरणाचे ११ दरवाजे उघडले With HD Quality

    द्वारा Metro News | 1131 दृश्य

  • जामखेडमध्ये विधानसभा निवडणुकीत मारहाण,आठ आरोपींची जामिनावर सुटका

    २१ ऑक्टोबरला पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी कर्जत-जामखेड मतदारसंघातील जामखेड तालुक्यातील बांधखंडक गावामध्ये वाहनातून मतदार वाहतुकीच्या कारणावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रोहित पवार आणि भाजपचे उमेदवार प्रा. राम शिंदे यांच्या समर्थकांमध्ये मारहाण झाली होती.या प्रकरणात आठ जणांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली होती, या आरोपीना मंगळवारी न्यायालयात हजर केल्यावर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. बांधखडकमध्ये सोमवारी मतदानाच्या दिवशी राष्ट्रवादी आणि भाजपच्या दोन गटात पोलिंग एजंटच्या भांडणातून हि मारामारी झाली होती.

    Watch जामखेडमध्ये विधानसभा निवडणुकीत मारहाण,आठ आरोपींची जामिनावर सुटका With HD Quality

    द्वारा Metro News | 465 दृश्य

  • सौरव गांगुलीने स्वीकारला 'बीसीसीआय'च्या अध्यक्षपदाचा पदभार

    टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने आज अगदी अधिकृतपणे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या म्हणजेच बीसीसीआय च्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली आहे, या बरोबरच सुप्रीम कोर्टाच्या देखरेखीखाली मंडळाचे कामकाज पाहणाऱ्या प्रशासकांच्या समितीचा कार्यकाल देखील आता संपुष्टात आलेला आहे. या पुढे मंडळाशी संबंधित सर्व कामकाज बीसीसीआयचे निवडून आलेले प्रतिनिधीच पाहणार असून सुप्रीम कोर्टाने निश्चित केलेल्या जबाबदारीबाबत आपण अतिशय समाधानी असल्याची प्रतिक्रिया बुधवारी बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी उपस्थित राहण्यासाठी आलेले सीओएचे अध्यक्ष विनोद राय यांनी या सभेत उपस्थित राहण्यापूर्वी म्हटले आहे. बीसीसीआयच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारल्याबरोबर कामाला सुरुवात करावी असे निर्देश या पूर्वी सुप्रीम कोर्टात न्यायाधीश एस. ए. बोबडे आणि न्यायाधीश एल. नागेश्वर राव यांच्या खंडपीठाने प्रशासकांच्या समितीला दिले होते. भारताचे माजी नियंत्रक आणि महालेखा परीक्षक विनोद पाय यांच्या नेतृत्वात ही प्रशासकीय समिती गेल्या ३३ महिन्यांपासून मंडळाचे कामकाज पाहत होती.

    Watch सौरव गांगुलीने स्वीकारला 'बीसीसीआय'च्या अध्यक्षपदाचा पदभार With HD Quality

    द्वारा Metro News | 355 दृश्य

  • साईबन मधील प्राण्याची लाईफसाईज सजीव शिल्प पर्यटकांची साईबनमध्ये गर्दी

    अहमदनगर मधील शिर्डीरोडवर एमआयडीसीच्या मागे असणार्या साईबनमध्ये मोठ्या प्रमाणात झाडी आहे, यामध्ये अनेक प्राण्याची लाइफ साईज शिल्प ठेवलेली आहे, ती इतकी सजीव वाटतात कि पाहताक्षणी मनुष्य बिचकतो.तर जवळ जाऊन पाहिल्यावर ते शिल्प आहे हे समजते. सध्या साईबन मधील हे प्राणी शिल्प सध्याच्या शाळेच्या सहलीमधील मुलाबरोबरच सर्वच पर्यटकाचे आकर्षण बनले आहे,हुबेहूब जिवंत प्राण्याप्रमाणे दिसणाऱ्या या पुतळ्यामुळे जंगल सफारीचा आनंद सर्वाना मिळत आहे.यामध्ये वाघ,सिंह,हत्ती,झीराफ,डायनासोर,माकड,गेंडा,हरीण,चिंकारा,आदि प्राणी आहेत, या शिवाय अनेक सजीव प्राणी या ठिकाणी पाहयला मिळतात तर संद्याकाळी जंगली मोर हि दिसतात.साईबन झालेल्या पावसामुळे हिरवेगार झाले असून,सध्या रोज गर्दी वाढत आहे.निसर्गाचा हिरवा परिसर,सर्व प्रकारची खेळणी आणि मनोरंजन करणारे प्राणी,वनभोजन यासाठी पर्यटक या उद्यानाला भेट देतात


    Watch साईबन मधील प्राण्याची लाईफसाईज सजीव शिल्प पर्यटकांची साईबनमध्ये गर्दी With HD Quality

    द्वारा Metro News | 359 दृश्य

  • ३२३७ उमेदवारांचे भवितव्य मतदान पेटीत बंद,२१ ऑक्टोबरला पार पडली मतदान प्रक्रिया

    अवघ्या देशाचे लक्ष लागलेल्या राज्य विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी मतदान प्रक्रिया पार पडली आहे, सतत येणाऱ्या पावसामुळे राज्यभर मतदान यंत्रणेला तारेवरची कसरत करावी लागली राज्यातील ३२३७ उमेदवारांचे भवितव्य मतदान पेटीत बंद झालं आहे, महाराष्ट्रासह हरियाणा मध्ये देखील विधानसभेसाठी मतदान पार पडलं आहे, येत्या २४ ऑक्टोबरला निवडणुकीचा निकाल आता जाहीर होणार आहे, महाराष्ट्रात २८८ जागांसाठी काल मतदान झालं आहे, संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ५४. ५३ टक्के मतदान झालं होत, संध्याकाळी पाचनंतर शेवटच्या एका तासात मतदारांनी मतदान केंद्रावर गर्दी केल्याने मतदानासाठी रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळाल आहे, निवडणूक आयोगाने मतदारांसाठी अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या .दिव्यांगांसाठी व्हीलचेअर, वाहने आदी सुविधा उपलब्ध केल्या आहेत. ठिकठिकाणी दिव्यांगने देखील मोठ्या उत्साहाने मतदान केलं आहे.


    Watch ३२३७ उमेदवारांचे भवितव्य मतदान पेटीत बंद,२१ ऑक्टोबरला पार पडली मतदान प्रक्रिया With HD Quality

    द्वारा Daily Times News | 431 दृश्य

  • हॉटेल दामूअण्णाचा नगरमध्ये स्तुत्य उपक्रम मतदान करा आणि सवलत मिळवा

    भारतासारख्या लोकशाही प्रधान देशात आजही मतदानाच्या मूलभूत हक्काबाबत उदासी दिसून आली आहे, सध्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये सर्वानी मतदानाचा हक्क बजवावा यासाठी सराफ बाजारातील कोल्हापुरी हॉटेल दामू अण्णा इथे मतदान केल्यानंतर बम्पर सूट देण्याचा निर्णय हॉटेल प्रशासनाने घेतला होता, २१ ऑक्टोबर नंतर १५ दिवस २५ टक्के सवलत देण्यात आली आहे. मतदारांना मतदानाचा पुरावा म्हणून शाई असलेले बोट दाखविणे आवश्यक आहे. हि सवलत मतदान केलेल्या नागरिकांसाठी देण्यात आली आहे. या उपक्रमाबाबत ९०२१६४२६३८ या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन हॉटेल संचालक राहुल बांगर यांनी केले आहे

    Watch हॉटेल दामूअण्णाचा नगरमध्ये स्तुत्य उपक्रम मतदान करा आणि सवलत मिळवा With HD Quality

    द्वारा Metro News | 314 दृश्य

  • भाजप आणि राष्ट्रवादी जामखेडमध्ये भिडले ,परस्परविरोधी फिर्याद दाखल

    बिजेपी पक्षाचे काम का करतो येथून पुढे काम केले तर गाठ माझ्याशी आहे असे म्हणून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले, यातून दोन्ही गटात लाकडी दांडके, चाकू आणि दगडाने एकमेकांना मारहाण करण्यात आली. यामध्ये दोन जण जखमी झाले आहेत. याबाबत जामखेड पोलिसात दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी परस्परविरोधी फिर्यादी दाखल केल्या आहेत.याबाबत भालेराव हिरालाल वनवे याने फिर्याद दिली की, सोमवारी दुपारी दिड वाजता मतदान करण्यासाठी मोटारसायकलवरून बांधखडक शिवारातील रस्त्यावरून जात असताना आरोपी सुशेन शहादेव वनवे रा. बांधखडक आणि काकासाहेब भाऊसाहेब खाडे रा. डोळेवाडी आणि त्यांचे दोन अनोळखी अंगरक्षक यांनी मोटारसायकल अडवून फिर्यादी भालेराव वनवे यास म्हणाले, तू बीजेपी पक्षाचे काम करतो का तू जर येथून पुढे बीजेपी पक्षाचे काम केले तर माझ्याशी गाठ आहे. असे म्हणून आरोपी सुशेन शहादेव वनवे याने त्याच्या हातातील चाकूने फिर्यादीच्या नाकावर वार केला आणि आरोपी काकासाहेब खाडे याने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली ,शिवीगाळ करून येथून पुढे आमच्या नादी लागला तर जिवंत ठेवणार नाही असा दम दिला अशी फिर्याद भालेराव वनवे यांनी दाखल केली यावरून पोलिसांनी आरोपीवर भादवी कलम ३२४, ३२३, ३४१, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.


    Watch भाजप आणि राष्ट्रवादी जामखेडमध्ये भिडले ,परस्परविरोधी फिर्याद दाखल With HD Quality

    द्वारा Metro News | 272 दृश्य

  • महायुतीला १९२ ते २१६ जागा महाराष्ट्रात महायुतीचा एक्झिट पोल

    भाजप आणि शिवसेनेच्या महायुतीला १९२ ते २१६ जागा मिळतील असा अंदाज एबीपी सी व्होटर्सच्या एक्झिट पोलमध्ये वर्तविण्यात आला आहे, कालच सगळ्या उमेदवारांच भवितव्य मतपेटीत बंद झालं आहे. या एक्झिट पोलनुसार, महायुतीला १९२ ते २१६ जागा मिळतील, आघाडीला ५५ ते ८१ जागा मिळतील इतर पक्षांना ४ ते ११ जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. दुपारी ३ वाजेपर्यंत जे मतदान झालं त्यानुसार हा अंदाज वर्तविण्यात आलं आहे. महायुती २०० जागा पार करणार यात काहीही शंका नाही अस एबीपी सी व्होटर्सच्या एक्झिट पोलमध्ये सांगण्यात आलं आहे. या निवडणुकीसाठी सगळ्याच नेत्यांनी प्रचाराचं मैदान गाजविल आहे, मात्र भाजपा आणि शिवसेना यांचीच सरशी होणार आहे हे एक्झिट पोल सांगत आहे, राज्यात ६ वाजेपर्यंत ६०. टक्के मतदान झालं आहे,


    Watch महायुतीला १९२ ते २१६ जागा महाराष्ट्रात महायुतीचा एक्झिट पोल With HD Quality

    द्वारा Metro News | 4077 दृश्य

  • मतदान केंद्रात शाई फेकून ईव्हीएम विरोधात निषेध

    ईव्हीएम मशीन तसेच सरकारच्या विरोधात ठाण्यातील सामाजिक कार्यकर्ते सुनील खांबे यांनी निषेध केलाय, सुनील खांबे यांनी ठाण्यातील मुख्य पोस्ट ऑफिस इथे मतदानाला गेले असतांना शाई ओतून सरकारचा निषेध केला,या प्रकरणी ठाणे नगर पोलिसांनी सुनील खांबे यांना ताब्यात घेतलं आहे. सुनील खांबे यांनी ईव्हीएमचा निषेध असो, लोकशाही झिंदाबाद ,ईव्हीएम मशीन मुर्दा बाद अश्या घोषणा दिल्या आहेत, तसेच ईव्हीएम मशीनवर शाई फेकत खांबे यांनी निषेध केला आहे, खांबे यांनी मतदान केंद्रात धुमाकूळ घातल्याने पोलिसांनी वेळीच धाव घेत त्यांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान ईव्हीएम मशीनमधील चिपमध्ये घोळ करून मतदानाची आकडेवारी बदलता येऊ शकते असा आरोप विरोधकांनी केला आहे. त्यामुळे हि निवडणूक मत पत्रिकेवर व्हावी अशी मागणी विरोधकांनी निवडणुकीआधी केली होती, मात्र निवडणूक आयोगाने या मागणीला केराची टोपली दाखवली आहे.

    Watch मतदान केंद्रात शाई फेकून ईव्हीएम विरोधात निषेध With HD Quality

    द्वारा Metro News | 285 दृश्य

  • नगरमधील तृतीयपथियांनी केले मतदान , काजल गुरु यांनी दिली प्रतिक्रिया

    आज अहमदनगर जिल्ह्यात अपक्ष उमेदवारांसह विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांचा भविष्य मतपेटीत बंद होणार आहे, ठिकठिकाणच्या मतदान केंद्रावर जाऊन नागरिकांनी आपला मतदानाचा मूलभूत हक्क बजावलंय,हा हक्क बजावन्यात तृतीयपंथी देखील मागे हटले नाहीत, त्यांनी देखील चिखलात मतदान केंद्रावर जाऊन आपला हक्क बाजवला आहे. सामान्य जनतेसारखी आमच्या देखील काही मागण्या आहेत त्या मागील पाच वर्षात पूर्ण झालेल्या नाहीत ,त्यामुळे आम्हाला दिलेली आश्वासने पूर्ण करावीत.कारण आम्ही देखील आमचा मतदानाचा हक्क चोखपणे पार पडतो असं मत तृतीयपंथी जिल्हाध्यक्ष काजल गुरु यांनी व्यक्त केलं आहे.


    Watch नगरमधील तृतीयपथियांनी केले मतदान , काजल गुरु यांनी दिली प्रतिक्रिया With HD Quality

    द्वारा Metro News | 402 दृश्य

  • जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केले मतदान

    अहमदनगर जिल्ह्यात आज सर्व तालुक्यात मतदान प्रक्रिया मोठ्या उत्साहाने संपन्न होत आहे,जिल्ह्यातील बारा विधानसभा मतदार संघासाठी आज सकाळी ७ वाजल्यापासून मतदान प्रक्रियेत सुरुवात झाली. पावसाचे वातावरण असून काही ठिकाणी संततधार सुरू आहे. मात्र, तरीही मतदार सकाळपासून मतदानासाठी बाहेर पडत असल्याचे चित्र आहे. राळेगणसिद्धी मध्ये जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी देखील मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.


    Watch जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केले मतदान With HD Quality

    द्वारा Metro News | 447 दृश्य

  • अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघात चार सखी मतदान केंद्र

    महाराष्ट्र सार्वत्रिक विधानसभा निवडणूक 2019 च्या निमित्ताने महिलांचे मतदानाचे प्रमाण वाढावे याकरिता राज्य निवडणूक आयोगाच्या माध्यमातून सखी मतदान केंद्रांची रचना करण्यात आली असून अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघातील सुमारे चार सखी मतदान केंद्र आकर्षक रांगोळ्या, सेल्फी पॉइंट, लोकशाहीला पत्र, मतदानाची शपथ, मतदार स्वाक्षरी अभियान, सखींच्या मुलांसाठी खेळणी, सौंदर्यप्रसाधने आरशाच्या माध्यमातून स

    Watch अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघात चार सखी मतदान केंद्र With HD Quality

    द्वारा Metro News | 300 दृश्य

  • नगर जिल्ह्यातील बारा विधानसभा मतदार संघासाठी मतदान

    अहमदनगर जिल्ह्यात आज सर्व तालुक्यात मतदान प्रक्रिया मोठ्या उत्साहाने संपन्न होत आहे,जिल्ह्यातील बारा विधानसभा मतदार संघासाठी आज सकाळी ७ वाजल्यापासून मतदान प्रक्रियेत सुरुवात झाली. जिल्ह्यात पावसाचे वातावरण असून काही ठिकाणी संततधार सुरू आहे. मात्र, तरीही मतदार सकाळपासून मतदानासाठी बाहेर पडत असल्याचे चित्र आहे , याच पार्शवभूमीवर राहुरी मतदार संघातील आमदार आणि भाजपा चे उमेद्वार शिवाजी कर्डीले यांनी आज बुऱ्हाणगर येथे आपला मतदानाचा हक्क बजावला.तसेच वंचित बहुजन आघाडीचे अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार किरण काळे यांनी देखील आपल्या पत्नीसोबत मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क.बजावलाय, नगर शहर मतदार संघात माजी आमदार आणि शिवसेनेचे उमेद्वार अनिल राठोड यांनी मुलगा विक्रम राठोड आणि पत्नी शशिकला राठोड यांच्या समवेत मतदानाचा हक्क बजावलाय. मतदारांना मतदान करण्याचे आव्हाहन यावेळी अनिल राठोड यांनी केलय.नगर शहर विधानसभा मतदारसंघातील आमदार जाणीव राष्ट्रवादीचे उमेदवार संग्राम जगताप यांनी देखील आपल्या मतदानाचा हक्क बजावलाय.


    Watch नगर जिल्ह्यातील बारा विधानसभा मतदार संघासाठी मतदान With HD Quality

    द्वारा Metro News | 432 दृश्य

  • मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनातं मतदान केंद्रांवर मतदारांना आरोग्य सुविधा उपलब्ध

    अहमदनगर शहर आणि तालुक्यातील मतदान केंद्रावर मतदारांत मोठ्या प्रमाणावर उत्साह दिसून येत होता. अनेक ठिकाणी महिलांच्या रांगा लागल्या होत्या तर ज्या ठिकाणी पुरुषांच्य रांगा होत्या. तिथं पुरूष महिलांना रांगेत उभे न करता थेट मतदान प्रक्रिया साठी पाठवत होते.या वेळी मतदान केंद्रांवर कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आला असुन , प्रशासनाने आरोग्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रांवर मतदारांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात आला असून याठिकाणी आशा स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात आली आहे, तसेच त्यांच्यकडे प्राथमिक औषध उपचारांचे किट देण्यात आले आहे. जामखेड शहरात सलग दोन दिवस पाऊस झाल्यामुळे मतदार केंद्राबाहेर मतदारांची अलोट गर्दी होती. तरूण, युवक आणि युवती प्रथमच मतदान करीत असल्याने त्यांना मतदानाबाबत उत्साह दिसून येत होता. दुपारी बारा वाजेपर्यंत २५ टक्के मतदान झाले होते.यावेळी आमचे प्रतिनिधी नासीर पठाण यांनी मतदान केंद्रांवरील आढावा घेतलाय .


    Watch मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनातं मतदान केंद्रांवर मतदारांना आरोग्य सुविधा उपलब्ध With HD Quality

    द्वारा Metro News | 350 दृश्य

  • राम शिंदे यांनी संपूर्ण कुटूंबासह बजावला मतदानाचा हक्क

    मतदारसंघात मोठय़ा प्रमाणावर विकासाचे कामे केली आहेत, या बळावर माझी निवडणूक होत आहे विरोधकाकडे विकास कामे सांगण्याबाबत काही नाही. या निवडणुकीत संपूर्ण पवार कुटुंब माझ्या सारख्या सर्वसामान्य उमेदवाराविरोधात उतरले यातच माझा विजय आहे. असा विश्वास पालकमंत्री राम शिंदे यांनी आमच्या प्रतिनिधी जवळ व्यक्त केला. पालकमंत्री राम शिंदे यांनी चोंडी येथील जिल्हा परिषद शाळेतील मतदान केंद्रावर संपूर्ण कुटूंबासह मतदानाचा हक्क बजावला, यानंतर ते प्रतिनिधीशी बोलत होते. यावेळी ते म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रूपाने देशात भाजपचे सरकार आहे आणि राज्यात भाजपसेना महायुतीचे सरकार येणार आहे. मी भुमीपत्र आहे, त्यामुळे निवडून येणार आहे. पुढील काळात मतदारसंघात जे कामे झाली नाही आणि जनतेच्या मनातील कामे करून दाखवणार आहे असे राम शिंदे म्हणाले

    Watch राम शिंदे यांनी संपूर्ण कुटूंबासह बजावला मतदानाचा हक्क With HD Quality

    द्वारा Metro News | 463 दृश्य

  • बॅनर लावून विकासाचा देखावा करणाऱ्यांच्या रोहित पवार विरोधात

    रोहित पवार यांची मतदान केंद्राना भेट
    प्रतिनिधी नासीर पठाण यांनी केली रोहित पवार यांच्याशी बातचीत






    माझी लढत पालकमंत्री राम शिंदे यांच्या विरोधात नाही तर त्यांनी बॅनर लावून जो विकासाचा देखावा केला आहे त्यासोबत आहे. विकासासाठी आलेला निधी खर्च झाला मात्र तो प्रत्यक्षात दिसत नाही. न केलेल्या कामाला माझा विरोध आहे अशी प्रतिक्रिया रोहीत पवार आमचे प्रतिनिधी नासीर पठाण यांच्याशी बोलताना व्यक्त केली. ल. ना. होशिंग विद्यालयात मतदान केंद्रावर भेट दिल्यानंतर रोहीत पवार प्रतिनिधीशी बोलत होते.


    Watch बॅनर लावून विकासाचा देखावा करणाऱ्यांच्या रोहित पवार विरोधात With HD Quality

    द्वारा Metro News | 411 दृश्य

  • अंतिम टप्प्यात नगर शहरात जोरदार प्रचार

    महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात नगर शहरात सर्व पक्षांच्या उमेदवारांचा प्रचार जोरात सुरू आहे. शिवसेनेचे उमेदवार अनिल राठोड, राष्ट्रवादीचे संग्राम जगताप, वंचित बहुजन आघाडीचे किरण काळे, मनसेचे संतोष वाकळे, बहुजन समाज पक्षाचे श्रीपाद छिंदम व 'एमआयएम'चे मीर आसिफ सुलतान यांनी शहराच्या विविध भागांत फिरून नागरिकांच्या भेटीगाठी घेण्यावर भर दिला आहे. शनिवारी या सर्वांच्या प्रचाराची सांगता होणार असल्याने त्यादृष्टिने शक्तिप्रदर्शन करण्याचेही नियोजन सुरू आहे ,नगर शहर मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार संग्राम जगताप यांनी जाहीरनाम्यातून नगर शहराचे भविष्यातील पाच वर्षांचे विकास व्हिजन मांडल आहे, तर शिवसेनेचे नगर शहराचे उमेदवार अनिल राठोड यांच्या गुरुवारी संध्याकाळी सावेडी-पाइपलाइन रस्ता परिसरात झालेल्या प्रचार फेरीत भाजपचे विद्यमान खासदार डॉ. सुजय विखे, माजी खासदार आणि भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष दिलीप गांधी तसेच महापौर बाबासाहेब वाकळेंसह शिवसेना नगरसेवक सहभागी झाले होते, नगरमध्ये तुम्ही शिवसेनेचा आमदार निवडून दिला तर महापौर आपला, खासदार आपला आणि पुढे पालकमंत्रीही नगर शहरात असेल. त्यानंतर या शहराचा चेहरा सक्षम काम करून पुणे-मुंबईच्या धर्तीवर केवळ महायुतीचे सरकारच बदलेल, असा विश्वासही डॉ. विखेंनी व्यक्त केला


    Watch अंतिम टप्प्यात नगर शहरात जोरदार प्रचार With HD Quality

    द्वारा NEWS 1 KANNADA | 390 दृश्य

  • चर्चा तर होणारच मध्ये सुहास मुळे यांनी घेतली संग्राम जगताप यांची मुलाखत

    Charcha Tar Honarch Suhas Mulay


    Watch चर्चा तर होणारच मध्ये सुहास मुळे यांनी घेतली संग्राम जगताप यांची मुलाखत With HD Quality

    द्वारा Metro News | 16461 दृश्य

  • रणसंग्राम 2019-राजेश जानू

    रणसंग्राम 2019-अपक्ष उमेदवार राजेश जानू यांना सत्ताधारी पक्षाच्या उमेदवरांकडून धमक्या, मांडली व्यथा


    Watch रणसंग्राम 2019-राजेश जानू With HD Quality

    द्वारा Metro News | 290 दृश्य

  • गेम चेंज करणारा पाऊस ?,वयाच्या ७९ व्या वर्षी भर पावसात शरद पवार यांची सभा

    साताऱ्यात भर पावसात प्रचारसभा घेऊन राष्ट्रवादीचे शरद पवारांनी षटकार ठोकला आहे. त्यांची ही जिद्द, चिकाटी आणि लढवय्या वृत्तीवर फिदा होऊन मोबाइलवर तरुणांनी व्हॉट्सअॅप डीपी आणि स्टेटस बदलल्याचे चित्र दिसत आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रचाराचं रण आधीच जिंकल्याचं चित्र आहे,महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल नेमका काय लागेल हे येत्या २४ ऑक्टोबरला स्पष्ट होईलच,मोदी, शहा यांच्यापेक्षा पवारांच्याच भाषणांची चर्चा राज्यभरात सुरू आहे. महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यातील प्रश्न माहीत असलेल्या पवारांनी हे प्रश्न लोकांपुढं मांडत सत्ताधाऱ्यांना प्रत्युत्तर देत आहेत.राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या सातारा जिल्ह्यात काल झालेल्या सभेनं खऱ्या अर्थानं निवडणूक प्रचाराचा माहोल बदलून टाकला. खासदार आणि आमदार सोडून गेल्यानं अस्वस्थता असलेल्या साताऱ्यांतील कार्यकर्त्यांमध्ये काल पवारांनी जोश भरला. साताऱ्यांतील मतदारांसाठी त्यांनी भर पावसात सभा घेऊन राष्ट्रवादीला साथ देण्याचं आवाहन केलं. वयोवृद्ध आणि पायाच्या जखमेनं त्रस्त असलेल्या पवारांच्या या भाषणाचे व्हिडिओ महाराष्ट्रात व्हायरल झाले आहेत. आतापर्यंत केवळ शहरी तोंडवळ्याच्या नेत्यांना पसंती देणाऱ्या तरुणांनी आपले व्हॉट्सअॅप स्टेटस बदलले आहेत. 'भर पावसात भाषण करतानाचा पवारांचा फोटो' अनेकांच्या मोबाइलवर प्रोफाइल फोटो म्हणून झळकतो आहे. फेसबुक, ट्विटरवरही त्यांच्याच भाषणाची चर्चा सुरू आहे.


    Watch गेम चेंज करणारा पाऊस ?,वयाच्या ७९ व्या वर्षी भर पावसात शरद पवार यांची सभा With HD Quality

    द्वारा Metro News | 423 दृश्य

  • भाजपच्याच सर्व्हेत राम शिंदे अडचणीत, रोहित पवार यांचा विजय पक्का -खा.सुप्रिया सुळे

    भाजपच्या स्वतःच्या सर्व्हेत त्यांचे पाच ते सहा उमेदवार अडचणीत असल्याची बातमी आहे, आणि त्यात एक राम शिंदेंची जागापण आहे, त्यामुळे रोहित पवार यांचा विजय पक्का असल्याचे भाजपचाच सर्व्हे सांगतोय असे प्रतिपादन खा.सुप्रिया सुळे यांनी केलेय. कर्जतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रोहित पवार यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत त्या बोलत होत्या. महिला राष्ट्रवादीच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, राष्ट्रवादी युवतीच्या प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, जिल्हाध्यक्षा मंजुषा गुंड यावेळी उपस्थित होत्या.यावेळी बोलताना खा.सुळे यांनी रोहितचा विजय नक्की असल्याचा दाखला देताना भाजपच्या सर्व्हेच्या बातमीचा आधार घेत हे आपण नाही तर एका बातमीत आलेल्या भाजपचा सर्व्हे म्हणतोय असे सांगत भाजपचे पाच ते सहा मंत्री असलेले उमेदवार अडचणीत आहेत आणि त्यात रोहित यांच्या विरोधात उभे असलेले राम शिंदे यांचे पण नाव असल्याचे स्पष्ट केले. एका आईला माहीत असते की आपला मुलगा पास होणार की नापास त्यामुळे राम शिंदे यांची आई म्हणजे भाजप आहे आणि त्यात ते नापास होत असल्याचे म्हणत असतील तर आता रोहितला राहिलेल्या दिवसांत प्रचार करायची गरजच नसल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
    प्रतिनिधी नासीर पठाण सह कॅमेरामन अशोक वीर जामखेड


    Watch भाजपच्याच सर्व्हेत राम शिंदे अडचणीत, रोहित पवार यांचा विजय पक्का -खा.सुप्रिया सुळे With HD Quality

    द्वारा Metro News | 307 दृश्य

प्रमुख वीडियो

  • GAIL bringing INDIA together

    GAIL India increasing it's capacity and serving all over INDIA.

    Watch GAIL bringing INDIA together With HD Quality

    द्वारा GAIL Social | 733902 दृश्य

  • ECI Press Briefing

    Press briefing of Election Commission of India on completion of 2nd Phase of #LokSabhaElection2019 and State Legislative Assemblies elections.

    #PollingDay #DeskKaMahaTyohaar #NoVoterToBeLeftBehind

    Watch ECI Press Briefing With HD Quality

    द्वारा Election Commission of India | 434022 दृश्य

  • IRCTC 11

    CRPF signed an MoU with the IRCTC on Railway Reserved e-ticketing system

    Watch IRCTC 11 With HD Quality

    द्वारा CRPF India | 1131074 दृश्य

  • Launch of Gujarat Election Campaign in Ahmedabad

    Launch of Gujarat Election Campaign in Ahmedabad.

    #CongressNuKaamBoleChe

    Declaration:
    This video is an intellectual property belonging to the Indian National Congress. Please seek prior permission before using any part of this video in any form.


    For more videos, subscribe to Congress Party channel: https://www.youtube.com/user/indiacongress


    Follow Indian National Congress!

    Follow the Indian National Congress on
    Facebook: https://www.facebook.com/IndianNationalCongress
    Twitter:https://twitter.com/INCIndia
    Instagram: https://www.instagram.com/incindia/
    YouTube: https://www.youtube.com/user/indiacongress

    Follow Rahul Gandhi on

    YouTube: https://www.youtube.com/c/rahulgandhi/
    Facebook: https://www.facebook.com/rahulgandhi/
    Twitter: https://twitter.com/rahulgandhi/
    Instagram: https://www.instagram.com/rahulgandhi/

    Launch of Gujarat Election Campaign in Ahmedabad

    द्वारा Indian National Congress | 172221 दृश्य

  • Address by Sh. Rajeev Gupta, Secretary, Youth Affairs at "International Yoga Seminar"

    Address by Shri. Rajeev Gupta, Secretary, Youth Affairs, Ministry of Youth Affairs & Sports, at the "International Yoga Seminar" organized by "Shri Ram Chandra Mission" in April, 2016

    Watch Address by Sh. Rajeev Gupta, Secretary, Youth Affairs at "International Yoga Seminar" With HD Quality

    द्वारा Ministry of Youth Affairs | 770853 दृश्य

  • Robotic Process Automation is transforming businesses across the world

    Robotic Process Automation enables users to create software robots, or #Bots, that can observe, mimic & execute repetitive, time consuming #Digital #business processes by studying human actions.
    Watch the video to know how RPA is transforming #businesses.
    #ArtificialIntelligence

    Robotic Process Automation is transforming businesses across the world

    द्वारा CII | 209880 दृश्य

  • Kajal Aggarwal Ventures into the Home Lifestyle Space with her Exclusive Brand Licensing Program

    Kajal Aggarwal Ventures into the Home Lifestyle Space with her Exclusive Brand Licensing ProgramDo Follow Us On
    Instagram - @Bollywoodflash01
    Facebook - @Bollywoodflashhd
    Twitter - @Bollywoodflash1
    YouTube - https://www.youtube.com/channel/UCtO0JBGfHmBRRadsEdzlJng

    Kajal Aggarwal Ventures into the Home Lifestyle Space with her Exclusive Brand Licensing Program

    द्वारा BOLLYWOOD FLASH | 903 दृश्य

  • "Nishant forced me to go to Bigg Boss 18" - Nyra Banerjee #shorts #biggboss18

    Check out the video to know more.

    SUBSCRIBE To Bollywood Bubble:
    Click Here ► http://bit.ly/2hjMB6X

    Tune into Bollywood Bubble, your one stop destination for all the latest happenings, hot gossips, rumours and exclusive B-Town news...

    Also, Visit - https://www.bollywoodbubble.com . One stop Destination for Latest Bollywood Updates.

    Follow us on Instagram - https://www.instagram.com/bollywoodbubble/
    Like us on Facebook - https://www.facebook.com/BollywoodBubble
    Follow us on Twitter - https://twitter.com/bollybubble

    Click on the Subscribe Button NOW and Stay Tuned.

    "Nishant forced me to go to Bigg Boss 18" - Nyra Banerjee #shorts #biggboss18

    द्वारा Bollywood Bubble | 897 दृश्य